उद्धवसाहेब , तमाम शिवसैनिक तुमच्या सोबत !

शिंदे यांच्या बंडाळीनंतर नाशिकमध्ये झळकले बॅनर
नाशिक : मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना एकटी पडते की काय ? असा प्रश्न उपस्थित होत असताना नाशिकमध्ये ‘ उद्धवसाहेब , तमाम शिवसैनिक तुमच्या सोबत ‘ अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली . पंचवटी कारंजा येथे एका शिवसैनिकाने लावलेले हे बॅनर चर्चेचा विषय ठरले होते . विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेची आणि काँग्रेसची मते फुटली . त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यामुळे शिवसेनेच्या गोटात मोठी खळबळ उडाली . निकालानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे ‘ नॉट रीचेबल ‘ राहत शिवसेनेला मोठा धक्का दिला . यामुळे शिवसेनेच्या पायाखालची जमीन सरकली आहे . शिवसेनेमध्ये झालेल्या या भूकंपामुळे आता सरकार कोसळते की काय ? अशी चिन्हे निर्माण झाल्याने कट्टर शिवसैनिक एकवटले आहेत . मुंबईत शिवसेना कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक एकत्र आल्यानंतर आता नाशिकमध्येही शिवसैनिकांनी बॅनरबाजी करून आम्ही शिवसेनेसोबत असल्याचे सांगितले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *