उद्यम भारती महिला उद्योजिकांना बळ

उद्यम भारती

 

दिपाली  चांडक

 

उद्योजक देशाच्या प्रगतीत नेहमीच महत्वाचा आणि त्यात महिला उद्योजिकांना बळ देणे हेतू
ह्या विशेष सदरचा शुभारंभ …….

 

 

 

महिला सातत्याने प्रयत्नशील आहे आणि औद्योगिक विकासासाठी देशभर तयार करण्यात
आलेल्या पोषक वातावरणाचा लाभ महिला उद्योजिकांनी घ्यावा; नाविन्यपूर्ण उद्योगाच्या
संधी जाणून घेत स्वत:ला पुढे न्यावे; हिच इथून पुढे दर आठवड्याला उद्यम भारती तील
लेखामागे गावकरीची प्रामाणिक भूमिका ……..

 

 

आपल्या कौटुंबिक जबाबदारी योग्य रित्या पार करीत, स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न
महिला बघते. ह्या महत्वाकांक्षी महिला, जेव्हा अगदी योग्य व्यवसायाची निवड करण्याचा
विचार करतात तेव्हा त्यांना भरपूर संघर्ष करावा लागतो जसे स्वत:ची गृहीतके, अस्पष्ट
कल्पना, मार्केट बद्दल अपुरी माहिती, आवश्यक प्रशिक्षण, लागणारे भांडवल, …… असे
विविध प्रश्न … आणि त्यातील महत्वाचा प्रश्न म्हणजे नेमका कुठला व्यवसाय निवडावा की
जेणेकरून तो उत्तम गतीने पुढे नेता येईल. नेमके ह्या प्रश्नांचे उत्तर सापडले कि मनातील
संभ्रम दूर करण्याचे मार्ग सापडतील ह्यात शंका नाही.

 

प्रत्येक लेखात एका नवीन उद्योगांची माहिती आपणास मिळणार आहे. त्याची माहिती घेत तुम्ही तुमच्या
आवडीनुसार योग्य तो व्यवसाय निवळू शकाल पुढचा मार्ग शोधू शकाल.
महिलांमध्ये असणार्‍या उद्यमशीलतेच्या क्षमतांविषयी तीळमात्र शंका घेण्याची आवश्यकता नाही तरी हि
समाजात उद्योजक महिलांची संख्या अजूनही फारशी दिसत नाही. परतू त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन
मिळाल्यास, महिला उद्योगांच्या क्षेत्रातही मोठे कर्तृत्त्व दाखवू शकतात.

 

 

गावकरी सोबत चा हा प्रयत्न शास्त्रशुद्ध आणि परिणामांच्या अधिक जवळ जाणारा ठरेल हा
विश्वास वाटतो. आपण सर्व भगिनी वर्ग ह्याचा नक्कीच फायदा करून घ्याल हि अपेक्षा ….
चला तर इथून पुढे विविध उद्योगावर आपण सातत्याने संवाद साधत भेटू यात.

 

दिपाली  चांडक

लेखिका उद्योजिकासाठी प्रयत्नशील असणार्‍या स्वयंशक्ती स्त्री उद्यमी फौंडेशन, ह्या
स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *