उंबरठान जवळील वांगण बारीत दरड कोसळली,चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

वांगण बारीत दरड कोसळली,चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
उंबरठाण : गंगाराम गावित
मागील 3 दिवसांपासून अतिवृष्टी मुळे सुरगाणा तालुक्यात सतत धार चालू असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला,मात्र एकीकडे नुकसानीचे सत्र सूर आहे,तालुक्यातील नद्यांना भरपूर प्रमाणात पावसाच्या पाण्यामुळे पूर आलेला आहे त्यात बऱ्याच शेतकऱ्यांचे लावणीला आलेले भाताचे रोप वाहून घेतले गेले ,त्यातच आज रविवार रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उंबरठान जवळ असलेली वांगण बारीतील दरड कोसळली त्यामुळे पूर्ण डोंगर खचून रस्त्यावर पूर्ण चिखल व मोठ मोठे दगड,झाडे पडल्याने रस्त्यावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे ,सुदैवाने सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर जास्त वाहतूक नसल्याने जीवितहानी टळली मात्र सकाळी बर्डीपाडा ते नाशिक जाणारी महामंडळाची बस बारीत येताच दरड कोसळली मात्र चालकाच्या सावधगिरीमुळे कोणतीही हानी झालेली नाही ,मात्र दरवर्षी ह्या बारीत दरड कोसळत असते त्यामुळे स्थानिक प्रशासनाने थोडी दखल घ्यावी अशी मागणी होत आहे,

One thought on “उंबरठान जवळील वांगण बारीत दरड कोसळली,चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *