अनधिकृत होर्डिंग्जवर येणार टाच

विभागीय अधिकाऱ्यांना आयुक्तांच्या सूचना

नाशिक : प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त सूत्रे हाती रमेश पवार यांनी आयुक्तपदाची घेतल्यापासून प्रशासनाच्या आणण्यासाठी कामकाजात सुसूत्रता त्यांच्याकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत . अतिक्रमण मोहीम राबवण्याबरोबरच थकीत असलेली कोट्यवधींची रक्कम वसूल करण्यासाठी प्रयत्नशील आहे . दरम्यान , मंगळवारी ( दि . १० ) झालेल्या विभागीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी सहाही विभागांत कुठेही अनधिकृत होर्डिंग्ज दिसता कामा नये , अशा सूचना बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या . ज्या होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रुपीकरण होते असे होर्डिंग्ज दिसता कामा नये , अशा सूचना आयुक्तांनी संबंधितांना दिल्याचे समजते आहे . ज्या दिवशी आयुक्त रमेश पवार यांनी नाशिक महापालिकेचा पदभार स्वीकारला , त्याच दिवशी त्यांनी नाशिक शहर हे सुंदर शहर आहे . मात्र , सीबीएससह अनेक ठिकाणीलागलेल्या होर्डिंग्जमुळे शहराचे सौंदर्य आहे ते खराब होऊन त्याचे विद्रुपीकरण दिसते . त्यामुळे अशा प्रकारचे होर्डिंग्ज काढून होर्डिंग्जमुक्त शहर कसे करता येईल , यावर रोखठोक बोलले होते . दरम्यान , नाशिक शहरातील विविध भागात जन्मदिवसाचे , स्वागताचे , विविध व्यवसायाचे मोठमोठे होर्डिंग्ज अनेक ठिकाणी सहज दिसून येतात . अनेकदा या होर्डिंग्जवर नागरिकांनी तक्रारी व नाराजी यापूर्वी व्यक्त केली आहे . या होर्डिंग्जमुळे विद्रुपीकरण तर होतेच ; शिवाय विविध अपघातही झाल्याच्या घटना घडल्या आहेत . आयुक्त पवारांनी हाती पदभार घेतल्यानंतर शहराच्या सौंदर्यावर भर देत नाशिक कसे अधिक सुंदर दिसेल , यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत . यासाठी त्यांनी शहरातील मुख्य भागांना भेट देत परिसराची पाहणी केली . या पाहणी दौऱ्यात बहुतेक ठिकाणी होर्डिंग्ज दिसून आले . ज्या होर्डिंग्ज लावलेल्या आहेत . त्यातील बऱ्याच अनधिकृत असल्याचे समजते आहे . शहराला विद्रूप करणाऱ्या होर्डिंग्जवर लक्षठेवले जाणार आहे . तसेच किती अंतरावर होर्डिंग्ज लावले जावेत , याबाबत त्यांनी सूचना दिलेल्या आहेत . नुकतेच विभागीय अधिकाऱ्यांच्या अधिकारात वाढ करण्यात आल्याने नाशिकरोड , पूर्व , पश्चिम , पंचवटी , सिडको व सातपूर या विभागातील विभागीय अधिकाऱ्यांना अनधिकृत होर्डिंग्जकडे लक्ष ठेवावे लागणार आहे . पालिका आयुक्तांनी होर्डिंग्जचा विषय हाती घेतल्याने नाशिककरांकडून त्यांचे स्वागत केले जात आहे . होर्डिंग्जमुक्त शहर केल्यास नाशिक शहर हे अधिक सुंदर दिसेल , अशी भावना नागरिक बोलून दाखवित आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *