कळसूबाई शिखरावर चढण्याचा युवकांचा अनोखा विक्रम

नवरात्रोत्सवात 29 वर्षांत 361 वेळा चढाई; स्वच्छताविषयी जनजागृती

घोटी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील कळसूबाई मित्रमंडळाच्या सदस्यांनी गेल्या 29 वर्षांपासून नवरात्रोत्सवात कळसूबाईच्या शिखरावर अखंडितपणे जाण्याचा निर्धार कायम ठेवला. विशेष म्हणजे, आजपर्यंत 29 वर्षांत 361 वेळा कळसूबाईच्या शिखरावर जाण्याचा विक्रम केला. कळसूबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 150 युवकांनी सहभाग नोंदविला.
घोटी (ता. इगतपुरी) येथील भागीरथ मराडे व त्यांच्या दोन मित्रांनी 1997 मध्ये सुरू केलेली परंपरा आजतागायत सुरू ठेवली. यात 29 व्या वर्षात 150 ते 200 युवकांनी सहभागी घेतला. या युवकांच्या कार्याची दखल बाबासाहेब पुरंदरे, राज ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत त्यांच्या वतीने मातेच्या चरणी घटिकाचे पूजन करून अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्याकडे नवरात्रीची घटिका सुपूर्द
केली.
या अनोख्या धाडसी, कौतुकास्पद उपक्रमात शिखरप्रेमी, शिवप्रेमी, गडप्रेमी असलेल्या कळसूबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष मराडे, नीलेश पवार, प्रवीण भटाटे, काळू भोर, बाळू आरोटे, अशोक हेमके, सोमनाथ भगत, भगवान तोकडे, कैलास नवले, बाळू भोईर, राजेंद्र माने, विकास जाधव, संकेत वाडेकर, गणेश काळे, भागीरथ म्हसणे, शिवदास जोशी, भाऊसाहेब जोशी, श्रावण सोपे, गुरुनाथ आडोळे, गौतम दुभाषे, चेतन जाधव, चेतन छत्रे, नामदेव जोशी, नाना टाकळकर, कृष्णा वाहुले, यश हेमके, गणेश पंढरपुरे, नितीन भागवत, सोनू गिते, सागर गव्हाणे, किरण अहिरे, दीपक आरोटे, राजू मराडे, हरीश आतकरी, समाधान बिन्नर, शुभम जाधव, ओमकार जाधव, अजिंक्य जाधव, नीलेश आंबेकर, सुधाकर तांबे व इतर शेकडो गिर्यारोहक सहभागी होतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *