विनाकारण रेल्वेची चेन खेचणाऱ्यांकडून ५ लाख ४२ हजाराचा दंड वसूल

मनमाड : वार्ताहर

रेल्वे प्रशासनाकडून अनेक वेळा चालू गाडीची चैन ओढण्यावरून जनजागृती करूनही प्रवासी ऐकत नसल्याने रेल्वेने अशा विरुद्ध धडक कारवाईला सुरुवात केली आहे . रेल्वेने कारवाईचा बडगा उगारला आहे . याबाबत दंडात्मक कारवाई करण्यात येत असून सुमारे सहा लाखचा दंड वसूल केला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे . जानेवारी ते एप्रिल २०२२ या चार महिन्यांच्या जनजागृती मोहिमेअंतर्गत मध्यरेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे योग्य कारणाशिवाय धावत्या गाडीची साखळी ओढल्याबद्धल ९ ५२ जणांकडून ५ लाख ४२ हजार ५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे . अशा बेकायदा अलार्म चेन पुलिंगबद्दल रेल्वे कायद्याच्या कलम १४ ९ अंतर्गत कारवाई केली जाते . ज्यामध्ये आरोपीला एक हजार रुपयांपर्यंत पर्यंत दंड किंवा एक वर्षापर्यंत कारावास किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे . प्रवाशांना जागरूक करण्यासाठी आरपीएफकडून वेळोवेळी यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येते . यावर्षी जानेवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत भुसावळ विभागाकडून , योग्य कारणाशिवाय चेन पुलिंग करणाऱ्या एकूण ९ ५२ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आणि ५ लाख ४२ हजार ५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *