चाकरमान्यांना करावा लागला विविध अडचणींचा सामना
नाशिकरोड : प्रतिनिधी
नाशिकरोड परिसरात शुक्रवारी (दि. 9) सायंकाळपासून पुन्हा एकदा बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे दीड ते दोन तास सुरू असलेल्या संततधारेमुळे रस्ते जलमय झाले आहेत. कामावरून घरी परतणार्या चाकरमान्यांना व रस्त्यावर व्यवसाय करणार्या विक्रेत्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
पावसाच्या सुरुवातीसच महावितरणचा नेहमीचा कारनामा पुन्हा समोर आला. पावसासोबतच वीजपुरवठा खंडित झाला आणि सुमारे दोन तास परिसर अंधारात गेला. यामुळे रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला तर काही ठिकाणी ब्लॅकआउटची परिस्थिती उद्भवली.
गेल्या तीन दिवसांपासून नाशिकरोड परिसरात बेमोसमी पाऊस कोसळत आहे. दोन दिवसांपूर्वी जोरदार वार्यांमुळे अनेक झाडे कोसळली. परिणामी 12 ते 14 तास वीजपुरवठा ठप्प राहिला होता. गुरुवारी (दि. 8) दिवसभर उघडीप मिळाल्यानंतर शुक्रवारी (दि. 9)सायंकाळी सातनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि आठ वाजेनंतर त्यात अधिकच जोर आला.
या पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले असून, वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. चाकरमानी व कामगारांना भिजतच घर गाठावे लागले.
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…