नाशिकच्या सौंदर्यात भर पडणार, 32 चौकांचे होणार सुशोभीकरण

नाशिक : प्रतिनिधी
मार्च महिन्यात आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतलेले रमेश पवार वेगवेगळ्या निर्णयाने कामाची छाप सोडत असल्याचे दिसत आहे. याचाच भाग म्हणून शहरात नव्याने महापालिकेकडून 132 चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी नव्याने केलेले जाहीरात फलकांचे धोरण अंमलात येणार असल्याने शहरभर फलकांत सुसूत्रता दिसणार आहे.
नाशिक धार्मिक नगरी म्हणून जगभर प्रसिद्ध असून दर वर्षानी होणार्‍या कुंभमेळ्यासाठी देशभरातून तसेच जगातून भाविक दाखल होतात. याबरोबरच वर्षभर जगभरातील भाविक नाशिकला भेटी देत आस्तात. त्र्यंबकेश्‍वरला देखील श्रावनात महाशिवरात्री, एकादशी या दिवशी मोठ्या संख्येने शिवभक्त व वारकरी येत असतात. दरम्यान आता नाशिकच्या सौंदर्यकरणावर महापालिका आयुक्तांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
त्यानुसार 132 चौकांची यादी तयार केली आहे. चौकांचे सुशोभीकरण करतांना त्यात एकसारखेपणा असावा प्रत्यक्षात तो तसा दिसावा असे आयुक्तांचे प्रयत्न आहे. शहरातील सीबीएस, शालिमार येथील इंदिरा गांधी चौक, रविवार कारंजा, अशोक स्तंभ यांच्यासह इतर लहान-मोठे चौकांचा समावेश आहे. चौकांचे सुशोभीकरण झाल्यानंतर नाशिकचा एक वेगळा ठसा जगभरात निर्माण होणार आहे. तसेच येणार्‍या भाविकांना देखील नाशिकनगरी ही सुंदर वाटणार आहे.
महापालिकेतर्फे शहरातील चौकात सुशोभिकरणासाठी प्रायोजकांना संधी दिली जाते. पण प्रायोजकांशी करारा नंतर त्यांनी किती मोठ्या आकाराच्या जाहिराती करायच्या याचे मात्र निश्‍चित धोरण नसल्याने शहरात प्रायोजकांच्या इच्छेनुसार चित्रविचित्र स्वरुपाचे फलक झलकतात. मात्र यात आता सुसूत्रता येणार आहे.
महापालिकेचे आयुक्त रमेश पवार शहर सौंदर्यकरण तसेच सुशोभीकरणाबाबत जागरुक आहेत. महापालिका जाहिरात फलकांच्या आकाराबाबत धोरण निश्‍चित करीत आहे. सीएसआर फंडातून सगळ्या चौकांचे सुशोभीकरण करतांना, दरम्यान आयुक्तांनी जुन्या चौकांचे करार नव्याने तपासण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक दुभाजकांवर 20 ते 25 मिटर अंतरावर फलक लावले जावेत. एकसारख्या अंतराने ते असावेत. सगळे जाहीरात फलक 2 बाय एक आकाराचे असावे. प्रत्येक जाहिरातीच्या फलकावर एका बाजूला प्रायोजक, दुसरीकडे मनपाचे नाव असले पाहिजे. अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *