वळण
श्रद्धा बोरसे

कुणी चुकला, रागावला, एखाद्या व्यक्तींच्या अंगावर क्षुल्लक कारणावरून सुटला तर कुणीही अशा वागण्याचा निष्कर्ष लावताना हेच म्हणतो की काही वळण आहे की नाही. वळणाची व्याख्या कुठलीही एक असु शकत नाही.
आयुष्यात अनगिणत प्रकारची वळण आहेत. केसांचं, शरीराचं, स्वच्छ राहण्याचं, समाजात वावरताना चांगले वागण्याचं, कुठली गोष्ट अमलात आणताना शक्ती आणि बुद्धी वापरून कार्य पूर्ण करण्याचं, इतरांशी शिष्टाचारानं संवाद साधताना आवाजाच्या लयीत बोलण्याचं अशी असंख्य प्रकारची वळणं आहेत.
या जगात सगळ्यात जास्त वळणाचा उद्धार हा एका मुलीचा सतत होत असतो. ती आईवडिलांच्या घरी असेल तर तिथे सतत तिला असं रहा. असं कर अशा अगणित चांगली शिकवण आणि संस्कार दिले जातात.
आईवडिलांनी कितीही चांगलं वळण लेकीला लावले. तरी सासरी गेलेल्या मुलीच्या वळणाचा उद्धार केला जातो. कारण चांगलं पाहण्याची दृष्टी आणि सांभाळून घेण्याची मानसिक वृत्ती, मनाची विशालता, समजूतदारपणा इ. सर्वांकडे असेलच असं नाही.
अनेक चढ-उतारांनी भरलेल्या आयुष्यात माणसानं माणसांशी वागताना कुठल्याही तिरकसपणाने न वागणं, बोलणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. दैनंदिन आयुष्य जगताना अति सरळ राहणं म्हणजे ही या मतलबी जगात धोक्याची घंटा आहे. चढ-उतारांनी भरलेल्या या क्षणभंगुर आयुष्यात माणसाला माणसांकडूनच असंख्य अनुभव येतात. काही अगदी नगण्य लोक या अनुभवातून शिकतात, योग्य धडा घेतात, स्वतः मध्ये योग्य, सकारात्मक बदल करतात. प्रत्येक जण आपापल्या जागी योग्य आहे असं प्रत्येकाला वाटतं पण वास्तव म्हणजे सत्य काही वेगळच असते. ते समजून घेण्यासाठी मनाच्या मोठेपणाचा कसं लागतो.
जोपर्यंत मनुष्याच्या जीवनात काही अडचणी येत नाही तोवर त्याच आयुष्य सुंदर लयीत, एखाद्या सुंदर स्वप्नवत चालू असते. पण एकदा की अडचणी आल्या तर सगळी सोंग बाहेर यायला वेळ नाही लागत.
खोटा, वरवर, दिखावु आपलेपणाचा मुखवटा उतरतो. त्याच वेळी आयुष्याला वळण येतं. दुःख,
अडचणी, आजार, कर्ज अगणित अडचणी जेव्हा आयुष्यात येतात तेव्हा त्यांचा स्वीकार आव्हान म्हणून केला तर त्रास नक्कीच थोडा कमी होतो.
संकटाचा संकट म्हणून नाही तर आव्हान, नवीन काही शिकता येणारा धडा, ज्यात भितीचा सामना करावा लागतो तीच गोष्ट हाताळण्याचं कौशल्य किंवा झालेल्या चुका माणसाच्या आयुष्याला आत्मविकास, आत्मविश्वास साधण्यासाठी वळण देत असतात.
घडण आणि बिघडण या दोन्ही गोष्टी आयुष्याला वळण देत असतात. आयुष्यात ठराविक काळानंतर एका वळणावर माणुस विचार करायला लागतो की नक्की काय हवं आहे, काय करायचं होतं, काय करतोय, काय करायला हवं म्हणजे अडचणी, दुःख, समस्या अशा असंख्य गोष्टीमधुन मार्ग निघुन प्रगती होईल.
मृगजळरूपी सुखाला पकडण्यासाठीचा प्रयत्न करत असणारी प्रत्येक व्यक्ती आयुष्यात परिस्थिती, स्वभाव, वैचारिक दृष्टिकोन, प्रसंगानुरूप वेगळं वळण घेत जाते.
यात दोष कुणाचाही नसतो. परिस्थिती, विक्षिप्त वागणूक, आयुष्यात आलेल्या अयोग्य व्यक्ती माणसाला योग्य किंवा अयोग्य वळण घ्यायला भाग पाडतात. आयुष्यात कर्तव्याला अधिक महत्त्व आहे. अनेक संकटांचा सामना केल्यानंतर, कमी किंवा जास्त वयात चढ-उतार पाहिल्यावर, जीवनाची विविध रंग पाहिल्यावर एका वळणावर माणूस क्षणभर विश्रांती घेऊन विचार करायला सुरुवात करतो.
कितीही सरळ चला पण रस्त्यावर वळण आल्यावर वळावेच लागते. अगदी तसंच प्रत्येक व्यक्तीच आयुष्य विविध चांगल्या वाईट प्रसंगात वळण घेत जाते. जीवनात येणार्‍या चांगल्या वाईट माणसांमुळे ही आयुष्य वळण घेत असते.
फक्त माणसांची पारख महत्वाची असते. कुणी दिलेला योग्य किंवा अयोग्य सल्ला, मार्गदर्शन जीवनात आनंद किंवा दुःख घेऊन येत. शेवटी काय आयुष्य प्रत्येक क्षणी वळण घेत असते. जगात स्थिर अशी कुठलीही गोष्ट नाही. हे त्रिवार सत्य…

Bhagwat Udavant

Recent Posts

पावसाळ्यात केसांची निगा

पावसाळ्यात केस जास्त गळतात का? डॅन्डरफ जास्त होतो का? पावसाळ्यात केस जास्त गळतात आणि डॅन्ड्रफदेखील…

17 hours ago

आषाढी एकादशी उपवासाचे पूर्ण ताट

वरण-सुरणाची आमटी, भात -भगर, भाजी-भोपळा, पोळी-राजगिर्‍याचे फुलके, चटणी-नारळाची, चिंचेची, खजुराची, सुरणाची, कोशिंबीर -काकडीची, लोणचे- लिंबाचे…

17 hours ago

किचन ते कॉन्फरन्स रूम

भारतीय संस्कृतीत स्त्री ही कायमच एक आधारस्तंभ मानली गेली आहे. आई, बहीण, पत्नी, सून, मुलगी…

17 hours ago

पळसेत बिबट्याचे भरदिवसा शेतकऱ्यांना दर्शन

पळसेत बिबट्याचे भरदिवसा शेतकऱ्यांना दर्शन नाशिकरोड : प्रतिनिधी नाशिकरोड शहरापासून अगदी हकेच्या अंतरावर असणाऱ्या पळसे…

18 hours ago

कृषी शिक्षण प्रवेशप्रक्रिया व संधी

शाच्या आर्थिक प्रगतीत कृषी क्षेत्राचा वाटा मोठा आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कृषी…

19 hours ago

धोकादायक यशवंत मंडईवर हातोडा

मनपाकडून कार्यवाही; पाडकामाला महिना लागणार नाशिक : प्रतिनिधी रविवार कारंजा येथे 1968 मध्ये उभारलेल्या यशवंत…

19 hours ago