नाशिक : प्रतिनिधी
प्रेम या अडीच अक्षराच्या शब्दात प्रत्येकाच आयुष्य सामावलेल असतो. नाते कोणतेही असो नात्याचा मुळ पाया प्रेमावर अवलंबून असतो. फेब्रुवारी महिन्याला सुरूवात झाली की तरूणाईला व्हॅलेंटाईन डे चे वेध लागतात. मात्र व्हॅलेंटाईनच्या आधी व्हॅलेंटाईन वीक प्रेमी युगलाकडून साजरा केला जातो. केवळ व्हॅलेंटाईन डेच नाही, तर इतर दिवस आणि व्हॅलेंटाईन डे ला महत्त्व आहे. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत वेगवेगळे डे साजरे करण्यात येतात. प्रेमाचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीक हा विशेष आठवडा केवळ जोडप्यांकडूनच साजरा केला जात नाही, तर आपल्या प्रेमाच्या आवडीच्या व्यक्तीबद्दल आपल्या भावना आदर ही अनेक जण व्यक्त करत असतात. त्यातून प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी व्यक्त केली जात असते. विशेष म्हणजे अनेकजण हा आठवडा मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा आठवडा विशेषता प्रेमात असलेल्या लोकांसाठी आहे. फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना आहे. व्हॅलेंटाईन वीक असल्याने या महिन्यात लव्ह बर्ड्समध्ये उत्साहाचे वातावरण असते. त्यामुळे आजपासून सुरू होणार्या व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यासाठी तरूण वर्गाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. येणार्या सात दिवसात डे साजरे करत नात्यांची वीण घट्ट केली जाणार आहे.
व्हॅलेंटाईन वीक साठी बाजारपेठ सज्ज
व्हॅलेंटाईन वीकची तरूण वर्गाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे..त्याप्रमाणेच व्हॅलेंटाईन डे साठी बाजारपेठही सज्ज झाली आहे..बाजारपेठेत व्हॅलेंटाईनसाठी खास गिफ्ट,टेडी ,चॉकलेट , रोझ यांनी बाजारपेठ सजली आहे.
असा आहे व्हॅलेंटाईन वीक
7 फेब्रुवारी :रोझ डे
8 फेब्रुवारी :प्रपोज डे
9 फेब्रुवारी :चॉकलेट डे
10 फेब्रुवारी :टेडी डे
11 फेब्रुवारी :प्रोमिस डे
12 फेब्रुवारी : हग डे
13 फेब्रुवारी : किस डे
14 फेब्रुवारी :व्हॅलेंटाईन डे
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…