नाशिक ः प्रतिनिधी
मकरसंक्रांतीला तिळगूळ घ्या, गोड बोला, असे एकमेकंाना शुभेच्छा देत स्नेहबंध दृढ केले जातात. मकरसंक्रांत ते रथसप्तमीपर्यंत महिला हळदीकुंकूनिमित्ताने संसारोपयोगी वस्तूंचे वाण लुटतात.वाण देताना अनेकदा प्लास्टिकच्या वस्तू वा कायम घरात वापरल्या जाणार्या वस्तू दिल्या जातात.
यंदा संक्रांतीनिमित्ताने झाडांची दुर्मिळ रोपे, पर्यावरणपूरक गोमय उत्पादने, बांबूपासून बनविलेल्या वस्तू आदींचे वाण लुटण्यास पसंती दिली जात आहे. त्यासाठी इव्हेंट कंपनीद्वारे रोपे, गोमय दिवे आदी उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुणे, नाशिक येथे पर्यावरणपूरक आयुर्वेदिक झाडांची रोपे उपलब्ध करून देण्यात येत आहे. महिलांना याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
आणि निसर्गात रमणे माणसाला आवडते. शहरीकरणामुळे, व्यस्त जीवनशैलीमुळे नैसर्गिक गोष्टींचा आस्वाद घेता येत नाही. छोट्या घरांमुळे झाडे लावणे, गार्डन तयार करून हिरवळीचा आनंद अनेकांना घेता येत नाही. स्वयंपाकघरातील आयुर्वेदिक वस्तू सहज घरात उपलब्ध व्हाव्या यासाठी
आयुर्वेदिक देशी झाडांची दुर्मिळ रोपे, पर्यावरणपूरक वस्तूंना तसेच बांबूपासून तयार केलेले टुथब्रश वा इतर वस्तूंचे वाण लुटून नैसर्गिक वस्तूंची जपणूक आणि संवर्धन एकप्रकारे केले जाणार आहे.त्यामुळे संक्रांतीला वाण लुटताना पर्यावरणपूरक वस्तूंना मागणी वाढली आहे.
…यांना मागणी
बांबू टूथब्रश, गोमय दिवे
आयुर्वेदिक : शतावरी, अश्वगंधा, निरब्रह्मी, मांडुकपर्णी, पानफुटी, रान लसूण, गवती चहा
फुलझाडे : देशी गुलाब, मोगरा, अनंत, तगर, जास्वंद, पांढरा चाफा, सोनचाफा, बकुळ कांचन, मुचकुंद, बहावा – पुत्रांजीवा, कौशी, कहांडळ, उंडी, पांगारा सीता अशोक, हादगा, वेली लाल गुज, पांढरी गुंज, काळी गुंज, दमवेल, हाडजोड, गुळवेल, मगई पान.
फळझाड : संत्रा, मोसंबी, लिंबू, पेरू, सीताफळ, करवंद, आवळा, चिंच, जांभूळ, नारळ, केशर आंबा, कालिपत्ती, चिकू, कवट
वनौषधी : कडुनिंब, रिठा टेम्भुर्णी, साग, काळा उंबर मेडशिंगी,
टेटू मेहंदी, दातरंगी (कटेकोरंटी) मोह, मसाले लवंग दालचिनी, विलायची, काळी मिरी, ऑल स्पाइस कोकम, रूद्राक्ष, जायफळ, लेंडीपिंपळी.
अंमली पदार्थ विकणार्यांशी कनेक्शन उघड सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक पोलीस दलात मोठा घोटाळा उघडकीस…
मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…
नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…
नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…