सिन्नर : प्रतिनिधी
ऐतिहासिक स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना असलेल्या श्री गोंदेश्वर महादेव मंदिरात रविवारी (दि.15) महाशिवरात्र उत्सव भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होणार आहे. श्री गोंदेश्वर सेवा संघाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यंदा शृंगार दर्शन व भव्य नगरप्रदक्षिणा मिरवणूक हे प्रमुख आकर्षण
ठरणार आहे.
2018 मध्ये सिन्नरमधील तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सेवा संघाने कोणतीही बाह्य आर्थिक मदत न घेता केवळ सदस्य व लोकवर्गणीच्या माध्यमातून धार्मिक-सामाजिक उपक्रम राबवण्याची परंपरा सुरू ठेवली आहे.
पहाटे 6 वाजता उत्सवमूर्तीची महापूजा होईल. सकाळी 8 वाजता शहरातून भव्य नगरप्रदक्षिणा मिरवणूक निघेल. दुपारी 12 ते रात्री 9 या वेळेत भाविकांना शृंगार दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. सायंकाळी 7 वाजता भजन-कीर्तन, तर रात्री 10 वाजता महाआरतीने उत्सवाची सांगता होईल.
भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सेवा संघाने नियोजनबद्ध व्यवस्था केली आहे. शहरातील नागरिक व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोहित जाधव, विशाल परदेशी, सचिन बलक व संघाच्या सदस्यांनी केले आहे. महाशिवरात्र, श्रावण महोत्सव व दीपोत्सव यांसारखे कार्यक्रम भव्य स्वरूपात आयोजित करण्याबरोबरच पर्यावरणपूरक उपक्रम व स्वच्छता मोहिमांवरही संघाचा विशेष भर असल्याचे दिसून येते.
Various programs on the occasion of Mahashivratri at Gondeshwar Temple, Sinnar
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…