नाशिक

एबीबी कंपनीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे   आगळेवेगळे स्नेहसंमेलन

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक  एबीबी व्यवस्थापनाने 1978-2023 या 45वर्षात दीर्घ सेवा केलेल्या निवृत्त कर्मचार्यांना सपत्नीक आमंत्रित करत  आगळेवेगळे स्नेहसंमेलन अयोजित करण्यात आले होते. कार्पोरेट जगात जगत असतांना शेवटच्या दिवशी हातामध्ये हिशोबाचा चेक आणि पुष्पगुच्छ देवून सेवानिवृत्त केल्यावर त्या कर्मचार्याला पुन्हा कधीही बोलावले जात नाही. सुमारे 150 हुन अधिक सेवानिवृत्त कर्मचारी या स्नेहसंमेलनासाठी उपस्थित होते.   तीस ते चाळीस  वर्षांनी  एकमेकांना भेटण्याचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.  संमेलनाला दिल्ली, बेंगलोर, बरोडा, मुंबई, पुणे आदी ठिकाणहून वय वर्ष 72 ते 89  या वयोगटातील  ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली.मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी स्नेहसंमेलन आयोजनाची संकलपना सांगत   एबीबी नाशिकचे प्रेसिडेंट गणेश कोठावदे यांनी एबीबी कंपनीचा प्रवास सांगितला.
प्रविण मानकर ,  विश्वास शेवडे, कंपनीचे माजी जनरल मॅनेजर माधव दिग्रसकर, सी एम ठाकूर, गिरीश बाग आदींनी आपल्या भावना  व्यक्त करत जुन्या आठवणीना उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद कुलकर्णी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन सहस्त्रबुद्धे यांनी केले.
कंपनीचे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट हेड  मिलिंद तांबट यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल रत्नपारखी, अशोक कुलकर्णी, लक्ष्मीकांत खैरनार, वसंत सोनवणे,अमित सैनी आदींनी विशेष प्रयत्न केले.

बऱ्याच वर्षानंतर पुन्हा कंपनीत यायला मिळाल्यामुळे फोटो सेशन करण्यात आले.उपस्थितांपैकी प्रत्येकाने प्लांट व्हिजिट करून आपली जुनी जागा सापडते का ते शोधण्याचा प्रयत्न केला.   भोजनाचा आस्वाद घेत स्नेहसंमेलनाच्या  स्मृती मनात ठेऊन घराकडे प्रयाण केले. औद्योगिक वसाहतीत प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम  राबवण्यात आला आहे. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना आभार व्यक्त करण्यासाठी पोस्टकार्ड देण्यात आले.

         

  कंपनीच्या प्रगतीत वर्तमानातल्या कर्मचाऱ्यांबरोबरच भूतकाळातील कर्मचाऱ्यांचेही मोठे योगदान आहे म्हणूनच  या यशात आम्ही त्यांनाही सहभागी करून घेत आहोत. खरतर एखाद्या कंपनीसाठी नोकरीं सोडून जाणं किंवा रिटायर होणं हे काही नविन नाही पण व्यावसायिक ठिकाणीही नात्यातला ओलावा जपणे हेच या कार्यक्रमा मागचे उद्दिष्ट होते.

  -गणेश कोठावदे ,(  एबीबी प्रेसिडेंट)

Ashvini Pande

View Comments

  • Simply superb idea of reunion of the respective retired employees.
    Amazing .....
    Congratulations to Ganesh Sir, Dayanad Sir and ABB team.
    And obviously you all got a lot of blessings from their hearts

Recent Posts

कांद्याचे भाव गडगडणार

कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…

15 hours ago

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…

17 hours ago

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

1 day ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

1 day ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

1 day ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

2 days ago