गरुड रथातून वर वधू येतात तेव्हा….
सातपूर : हौसेला मोल नसते असे म्हणतात. त्यातही लग्न म्हटलं की माणूस मागे पुढे पाहत नाही. अशीच एक आगळीवेगळी घटना गंगापूर रोड येथील बालाजी लॉन्स येथे घडली.
वर आणि वधू विवाह सोहळ्यात थेट गरुड रथातून मंडपात दाखल झाले.
पिंपळगाव बहुला येथील प्रगतीशिल शेतकरी बांधकाम व्यावसायिक सुदाम भावले यांची मुलगी नीलम व सुभाष शेळके यांचे चिरंजीव मोहन यांचा विवाह पार पडला.सुरुवातीच्या काळात नवरी नवरदेवाला पालखीत घेऊन जायचे. त्यानंतर बैलगाडी आणि कालांतराने कारमधून वधू जात होती. मात्र आता वरवधू थेट गरुडरथामधून जात असल्याचे पाहून जमाना बदल गया है असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. भावले व शेळके परिवाराने नाशिकमध्ये पहिल्यांदाच गरुड रथामध्ये विवाहसोहळा पार पडल्याने नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. यात वरवधू या दोन्ही घरचे पाहुणे मंडळी देखील सहभागी झाले होते. या आधी सातपूर पिंपळगाव बहुला येथील पंचक्रोशीत या आधी हेलिकॉप्टरने वधुची पाठवणी झाली होती. मात्र, आता गरुडरथामधून वरवधू आल्याचे पाहून हा चर्चेचा विषय झाला.