उत्तर महाराष्ट्र

वीर जवान तुझे सलाम… उगांव येथील शाहिद जनार्दन ढोमसे अनंतात विलीन

लासलगाव:समीर पठाण

निफाड तालुक्यातील उगांव येथील भूमिपुत्र व भारतीय सैन्य दलातील जवान जनार्दन उत्तम ढोमसे (३२) यांना जम्मू काश्मीर येथे कर्तव्यवावर असतांना वीरमरण आले त्यांना शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल वातावरणात ‘भारत माता की जय,…. वीर जवान तुझे सलाम…आदी घोषणांसह मरळगोई येथे साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला.या वेळी लाडक्या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी उगाव,मरळगोई तसेच लासलगाव सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या मृत्यूने उगावं,मरळगोई व लासलगाव सह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शाहिद जवान जनार्दन उत्तम ढोमसे यांचे पार्थिव देह लासलगाव शहरातील प पू भगरी बाबा मंदिर येथे आणण्यात आले.फुलांनी व तिरंगा ध्वजाने सजविलेल्या भारतीय सैन्य दलाच्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा सुरुवात होऊन लासलगाव शहराच्या मेन रोड मार्गे मरळगोई येथे दाखल झाली.या अंत्ययात्रेत एन सी सी चे विद्यार्थ्यांसह लासलगाव,ऊगाव,मरळगोई व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अंत्ययात्रा मरळगोई येथे पोहचल्यानंतर शाहिद जनार्दन उत्तम ढोमसे यांच्या पार्थिवास त्यांचा मुलगा पवन(वय वर्ष 8)यांने अग्नीडाग दिला.या वेळी त्यांच्या पत्नी,मुलगी,आई,वडील,भाऊ व कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते.या वेळी शाहिद जनार्दन उत्तम ढोमसे यांना भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली तसेच या वेळी पोलिस प्रशासनाच्या वतीनेही मानवंदना देण्यात आली

या प्रसंगी निफाड च्या प्रांत डॉ अर्चना पठारे,तहसीलदार शरद घोरपडे,मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर,माजी जी प सदस्य डी के जगताप,लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप,माजी प स सदस्य शिवा सुरासे,मरळगोई चे सरपंच निवृत्ती जगताप,लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ,उगाव चे माजी उपसरपंच साहेबराव ढोमसे,शिवसेनेचे प्रकाश पाटील,वसंत पवार,शिवाजी सुपनर आदींनी शाहिद जनार्दन उत्तम ढोमसे यांच्या पार्थिावास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.या वेळी उगांवचे मधुकर ढोमसे दत्ता ढोमसे,ज्ञानेश्वर ढोमसे(चुलते),बाबुराव ढोमसे(आजोबा)प्रभाकर मापारी,भास्करराव पानगव्हाणे,माधवराव चव्हाण,अँड रामनाथ शिंदे,शिवा ढोमसे,मनोज पानगव्हाणे,मधुकर गवळी,संजय वाबळे,दत्तात्रय सुडके,बाळासाहेब होळकर तसेच लासलगाव,मराळगोई व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Bhagwat Udavant

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

11 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

11 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

11 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

11 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

12 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

12 hours ago