सामान्यांना वाहतूक कोंडीचा त्रास, रस्त्यावरील सांडपाण्याचा मुद्दाही ऐरणीवर
सिन्नर : प्रतिनिधी
सरदवाडी रोडवर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपूर्वी सिन्नर पोलीस आणि नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाई करत भाजीपाला व्यावसायिकांसाठी ’लक्ष्मणरेषा’ आखून दिली होती. मात्र, ही ’लक्ष्मणरेखा’ ओलांडून व्यावसायिकांनी पुन्हा रस्त्यावर ठाण मांडले आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. सिन्नर पोलीस प्रशासन आणि नगरपालिका या प्रश्नाची कायमस्वरूपी सोडवणूक कशी करणार, असा संतप्त सवाल उपनगरातील रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
हॉटेल अजिंक्यतारा ते थेट खुळे यांच्या हॉटेलपर्यंत भाजीपाला व्यावसायिक पथारी मांडून व्यवसाय करतात. व्यवसाय करताना त्यांनी रस्त्याच्या कडेला बसणे अपेक्षित आहे. मात्र, साइडपट्ट्यांच्याही पुढे जाऊन रस्त्यावर बसून भाजीपाला व्यावसायिक व्यवसाय करत असल्याने वाहतूक कोंडीला हातभार लागत आहे. व्यवसायिकांचे कॅरेट, भाजीपाल्याच्या पाट्या थेट रस्त्याच्या मध्यापर्यंत येऊ लागल्याने अल्पशा बोळीतून वाहन चालकांना या भागात मार्गक्रमण करावे लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी यासंदर्भात तक्रारी वाढल्याने सिन्नर पोलीस स्टेशन आणि नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने दोर्या ठोकून रस्त्याच्या दुतर्फा बसणार्या भाजीपाला व्यावसायिकांसाठी लक्ष्मणरेखा आखून दिली होते. अवघे 15 दिवस ते महिनाभर त्या लक्ष्मणरेषेचे व्यावसायिकांकडून पालन केले गेले. नाही म्हणायला या लक्ष्मणरेषेचे पालन होते किंवा नाही हे बघण्यासाठी पोलीसही अधूनमधून चक्कर मारत होते. मात्र, आता पोलिस, अतिक्रमण विभाग या रस्त्याकडे फिरकेनासा झाल्याने व्यावसायिकांनी पुन्हा मुख्य रस्त्यावरच अतिक्रमण करायला सुरुवात केली आहे. परिणामी या रस्त्यावर दररोज संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, दोन्ही बाजूंना दोन्ही बाजूकडून येणारी वाहने पास करणेही अवघड होऊन बसले आहे. दररोज संध्याकाळी येथील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहनचालकांकडून कर्णकर्कश हॉर्न वाजवले जातात. याशिवाय बराच वेळ वाहनचालकांना, उपनगरवासीयांना या वाहतूक कोंडीत अडकून बसावे लागते. रुग्ण घेऊन जाणार्या रुग्णवाहिकांनाही अनेकदा या वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. असे असतानाही नगरपालिका व पोलीस प्रशासन त्याकडे डोळेझाक करत असल्याने उपनगरवासीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…