नाशिक

लेखानगर परिसरात धारदार शस्त्रांंनी घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड

एकजण अटकेत; सात ते आठ संशयित फरार

सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेखानगर परिसरात गुरुवारी (दि. 29) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सात ते आठ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांचा वापर करून घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रकरणी अंबड पोलिसांनी कृष्णा दोंदे ऊर्फ केडी याला ताब्यात घेतले आहे. इतर सात ते आठ संशयित अद्याप फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल शामराव जाधव यांचा भाचा आणि कृष्णा दोंदे यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. या वादाच्या रागातून टोळक्याने धारदार शस्त्रे हातात घेऊन लेखानगर परिसरात दहशत माजवली आणि घरासमोर उभ्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तपासादरम्यान कृष्णा दोंदे याला ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
अंबड पोलीस हद्दीत गेल्या काही दिवसांपासून समाजकंटकांकडून रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्रे हातात घेऊन वाहनांची तोडफोड आणि नागरिकांवर हल्ल्याचे प्रकार घडत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. काही ठिकाणी अल्पवयीन गुन्हेगारांकडूनही कोयता, तलवार यांसारखी शस्त्रे वापरून दहशत माजवली जात असल्याचे दिसले आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांनंतर ही परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
यापूर्वी हनुमान चौक परिसरात चारचाकी वाहनांची तोडफोड आणि कामटवाडे परिसरात टोळक्याने नागरिकांवर हल्ल्याचे प्रकार घडले होते. सातत्याने घडणार्‍या अशा घटना नागरिकांमध्ये संताप निर्माण करीत असून, समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वाढत आहे. घटनेवेळी हवेत गोळीबार झाल्याची चर्चा होत असली तरी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी स्पष्ट केले की, घटनास्थळी कुठल्याही प्रकारचा गोळीबार झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत.

Vehicles parked in front of houses vandalized with sharp weapons in Lekhanagar area

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

9 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

9 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

9 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

9 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

10 hours ago