सिडको (प्रतिनिधी )
जुने सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अचानक चौक, साईबाबा मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या परिसरात 10 ते 12 दुचाकी गाड्यांची रात्री 11:30 वाजता तोडफोड करण्यात आली असून या प्रकरणी अंबड पोलिसांनी रात्रीच एकाला ताब्यात घेतले आहे. यात आणखी दोन जणांची नावे समोर आली असून पोलिस पथक त्यांच्या शोधार्थ रवाना झाले आहे.
जुने सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अचानक चौक, साईबाबा मंदिर मागची बाजू येथे शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास 10 ते 12 दुचाकी गाड्यांची अज्ञात समाज समाजकंटकांकडून तोडफोड करून दहशत पसरविण्याचा प्रकार घडला होता. या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अंबड पोलिसांना घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक प्रमिला कावळे व सहकारी यांनी त्वरीत घटना स्थळी भेट दिली. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध वेगाने सुरु केला. यात पोलिसांनी रात्री एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. इतर दोघांच्या शोधार्थ पथक रवना झाले आहे.
पत्नीला स्वर्गलोकी पाठवत मी पण जात आहे... नाशिकरोडला निवृत्त मुख्याध्यापकाने उचलले टोकाचे पाऊल नाशिकरोड :…
एचपीटीतील लिट-फेस्टमध्ये इंग्लिश-फ्रेंच संस्कृतीचे दर्शन नाशिक :- एचपीटी आर्ट्स अॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी…
गौतमी पाटीलने आपल्या ठसकेबाज लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सबसे कातील अशी ही नृत्यांगना…
भारतीय संविधानाची सखोल माहिती देणारा अनिल कुमार जवादे आणि ओंकार निर्मित सचिन उराडे लिखित आणि…
दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांच्या रुममधे सिलेंडरमधील…