पिंपळगावला एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडले
दिक्षी : मिनी दुबई आणि जिल्ह्यातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ अशी ओळख असलेल्या पिंपळगाव बसवंत येथील येथील चिंचखेड चौफुलीवरील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २८ लाख रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पिंपळगाव बसवंत येथील चिंचखेड चौफुली परिसर सतत गजबजलेला असतो. शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी याठिकाणी असणारे एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडले आणि त्यातून तब्बल २८ लाख रुपये लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे. चोरट्यांनी एटीएम फोडण्यास कटरचा वापर केला व ते महागड्या गाडीने आले होते, अशी माहिती मिळत आहे. एटीएम फोडताना चार जण सीसीटीव्हीत कैद झाले असून त्याआधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…