नाशिक

श्रमिकनगरमध्ये वाहनांची तोडफोड; दोन संशयित ताब्यात

सिडको : विशेष प्रतिनिधी
सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रमिकनगर परिसरात गुरुवारी (दि. 22) रात्री अज्ञात टवाळखोरांनी सात वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी दोघा संशयितांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यापूर्वीही श्रमिकनगरमध्ये दोन वेळा वाहनांची तोडफोड झाली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कडेपठार चौक, स्वामी समर्थ केंद्रामागील परिसर व सिद्धिविनायक चौकात विक्रांत साळवे, भाऊसाहेब आहिरे, अनिल राजवंशी, महेश कांबळे, रवींद्र वाघ, दत्तात्रय पाझरकर यांच्या गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. रात्रीच्या वेळी दारू पिऊन गोंधळ घालणार्‍या टोळक्यांचा वावर वाढला असून, त्यांच्याकडे प्राणघातक शस्त्रे असल्याच्या तक्रारी आहेत. हे टवाळखोर रात्रपाळीतील कामगारांना धमकावून लूटमार करत असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी आमदार सीमा हिरे, माजी महापौर दशरथ पाटील, माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी भेट देऊन नागरिकांची भेट घेतली.
पोलिसांकडे वारंवार गस्त घालण्याची मागणी करूनही गुन्हेशोध पथक निष्क्रिय असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, सातपूर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.पुढील तपास सुरू आहे.

आतापर्यंत झालेल्या वाहन तोडफोडीच्या घटना

1ं9 फेब्रुवारी 2024 : श्रमिकनगरमध्ये सात गाड्यांची तोडफोड.
2ं5 मे 2024 : पाच वाहनांची काचा फोडल्या.
4ं डिसेंबर 2023 : ध्रुवनगरमध्ये तीन गाड्यांची तोडफोड.
1ं9 जानेवारी 2023 : जिजामाता शाळेजवळ चार वाहनांच्या काचा फोडल्या.

गुन्हेशोध पथक निद्रावस्थेत

रात्री गुन्हेशोध पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठिकाणी गस्त घालण्याऐवजी

बहुतेक वेळा कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी गाडीतच झोपतात,

असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

पोलिसच्या हलगर्जीपणामुळेच टवाळखोर मुक्तपणे वावरत आहेत.

नागरिकांनी रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची जोरदार मागणी केली आहे.            

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

11 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

11 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

11 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

11 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

12 hours ago