नशीब आणि पाप-पुण्य
बहुसंख्य लोकांची वरील धारणा संपूर्ण चुकीची आहे. नशीब आधीच ठरलेले आहे, माणसाच्या हातात काहीही नाही. कपाळावर सटवीने जन्मानंतर पाचव्या दिवशी जे काही लिहून ठेवलेले आहे त्याचप्रमाणे सर्व काही घडणार, अशा आचरट समजुतीच्या आहारी जाऊन बहुसंख्य लोक स्वत:चा सर्वनाश ओढवून घेण्यास कारणीभूत ठरतात. वास्तविक वस्तुस्थिती याच्या नेमकी उलट आहे. जीवनविद्येचा खालील सिद्धांत या संदर्भात मौल्यवान आहे. नशिबात असेल तसे घडेल हे खरे नसून, माणूस जसे घडविल तसे नशीब घडेल हेच खरे.
पुढे काय घडणार हे सर्व जन्मल्यानंतर पाचव्या दिवशी सटवीने आधीच आपल्या कपाळावर लिहून ठेवलेले आहे, ही समजूत मुळातच पूर्णपणे चुकीची आहे.दुसर्‍या शब्दात हेच सांगावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की, माणूसच आपल्या कपाळावर लिहिण्याचे कार्य स्वत: आपल्या कर्मांनीच करत असतो.
खरे सांगावयाचे झाले तर पुढे काय घडणार हे शंभर टक्के जरी नाही तरी नव्वद टक्के माणूसच ठरवित असतो. अन्य कोणीही नाही. आज जी पुण्यकर्मे किंवा पापकर्मे माणूस करतो. त्यानुसार त्याचे उद्याचे भवितव्य ठरणार असते, कारण उद्याचे भवितव्य हे आजच्या कर्मांचे फळ (ठशरलींळेप) असते. म्हणून चुकून किंवा मोहाला बळी पडून किंवा अन्य काही कारणामुळे जर माणसाचे पाऊल वाकडे पडलेच तर निसर्गाने माणसाला जे कर्म स्वातंत्र्य बहाल केलेले आहे व सारासार विचार करण्यासाठी जी बुद्धी दिलेली आहे त्यांचा उपयोग करून त्या वाकड्या मार्गाने पुढे पुढे फरफटत न जाता त्यापासून तात्काळ परावृत्त होऊन परत सरळ मार्गावर येणे आवश्यक असते.
यासंदर्भात जीवनविद्येचा खालील सिद्धांत लक्षात ठेवणे इष्ट ठरेल.
वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
– सद्गुरू श्री वामनराव पै

 

Bhagwat Udavant

Recent Posts

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

2 hours ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

2 hours ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

13 hours ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

20 hours ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

21 hours ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

21 hours ago