नाशिक

तरुणाच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांचा रास्ता रोको

अवजड व विना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई; आरटीओकडून 1.63 लाखांचा दंड वसूल

सिन्नर : प्रतिनिधी
नायगाव घाटातील अपघातात 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी (दि.15) सकाळी नायगाव-सिन्नर चौफुलीवर अवजड वाहने अडवून आंदोलन छेडले. विना नंबर प्लेट व नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर ठोस कारवाई झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. यानंतर महसूल, रस्ते परिवहन व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत संयुक्त तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत विविध नियमभंग करणार्‍या वाहनांकडून 1 लाख 63 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तब्बल 7 अवजड वाहने विना नंबर प्लेट रस्त्यावरुन धावत असल्याचे उघड झाले.
शुक्रवारी नायगाव घाटातील पहिल्या वळणावर झालेल्या अपघातात ऋषिकेश अशोक पानसरे (22, रा. नायगाव) हा गंभीर जखमी झाला होता. उपचार सुरू असताना रविवारी त्याचा मृत्यू झाला. या अपघातात त्याची आई संगीता पानसरे यादेखील गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातास कारणीभूत वाहन हायवा असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी अवजड वाहने अडवून आंदोलन सुरू केले. संबंधित अधिकार्‍यांना घटनास्थळी बोलावून घेतल्याशिवाय आणि अवजड व विना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली.
त्यानंतर सकाळी 10 ते दुपारी एक वाजेदरम्यान आरटीओ, महसूल आणि पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने विशेष तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत पाच विना नंबरप्लेट वाहने, दोन मोठे हायवा तसेच विमा नसलेली आणि विविध नियमांचे उल्लंघन करणारी वाहने आढळून आली. संबंधित वाहनांवर कारवाई करून एकूण एक लाख 63 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

गौणखनिज वाहनांची परवाना तपासणी

तपासणीदरम्यान तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गौणखनिज वाहतुकीचे परवाने, रॉयल्टी पावत्या आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. यापुढेही नियम मोडणार्‍या वाहनांवर महसूल, रस्ते परिवहन व पोलिस विभागाकडून नियमित कारवाई सुरू राहील, असे आश्वासन अधिकार्‍यांनी ग्रामस्थांना दिले. त्यानंतर सकाळी दहा वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी एक वाजता मागे घेण्यात आले.

Villagers block road after youth’s death

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

16 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

16 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

16 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

16 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

16 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

16 hours ago