नाशिक

सिन्नर बाजार समितीच्या सभापतिपदी शरद थोरात

श्रीकृष्ण घुमरे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदावर निवड

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी शरद ज्ञानदेव थोरात यांची सोमवारी (दि. 15) बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते सभापती श्रीकृष्ण घुमरे यांनी इतर सहकारी सदस्यांना संधी मिळावी या उद्देशाने पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या विशेष सभेत थोरात यांच्या नावावर एकमत झाले.
या निवडीची घोषणा होताच बाजार समिती परिसरात समर्थकांनी गुलाल उधळत आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. निवडीनंतर खासदार राजाभाऊ वाजे आणि राजेश गडाख यांच्या हस्ते शरद थोरात यांचा सत्कार करण्यात आला.
सहाय्यक निबंधक संजय गिते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत श्रीकृष्ण घुमरे यांनी शरद थोरात यांच्या नावाची सूचना मांडली. संचालक सुनील चकोर यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. निर्धारित मुदतीत सभापतिपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने शरद थोरात यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
बैठकीस उपसभापती सिंधू कोकाटे यांच्यासह संचालक गणेश घोलप, शशिकांत गाडे, सुनील चकोर, जालिंदर थोरात, प्रकाश तुपे, नवनाथ नेहे, अनिल शेळके, भाऊसाहेब खाडे, विनायक घुमरे, संजय खैरनार, अ‍ॅड. शरद चतूर व सुरेखा पांगारकर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक संजय गिते यांनी काम पाहिले. त्यांना सहकार अधिकारी सुदर्शन तांदळे आणि बाजार समितीचे सचिव विजय विखे यांनी सहकार्य केले.
यावेळी केशव कोकाटे, नामदेव शिंदे, महेश थोरात, संदीप थोरात, नारायण थोरात, महेंद्र थोरात, दिगंबर चव्हाण, डॉ. मधुकर घुगे, सीताराम फटांगरे, भाऊसाहेब सैंद्रे, विश्वास थोरात, विलास थोरात, गोवर्धन शिंदे, कैलास डुंबरे, सुरेश तुपे, गजिराम सहाणे, शरद गिते, गणेश कोकाटे, दत्तू घुमरे, पिराजी पवार आणि ज्ञानेश्वर पांगारकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकरी हिताच्या निर्णयांना प्राधान्य

बाजार समितीच्या सर्व घटकांना विश्वासात घेऊन शेतकरी हिताचे निर्णय प्राधान्याने राबविणार आहे. बाजार समितीची विकासकामे गतीने पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळाच्या सहकार्याने प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सभापती शरद थोरात यांनी व्यक्त केली.

 

Sharad Thorat becomes Chairman of Sinnar Market Committee; celebrations follow the election.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

17 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

17 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

17 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

17 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

17 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

17 hours ago