नाशिक

सततच्या पावसामुळे द्राक्षबागा संकटात

द्राक्षबागांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव, खर्चही वाढला

लासलगाव : वार्ताहर
मे महिन्यात जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात झालेला बेमोसमी पाऊस तसेच 7 जूनपासून सुरू असलेल्या मॉन्सूनमधील सलग पावसामुळे लासलगावसह जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार अडचणीत आले आहेत. या सततच्या पावसामुळे बागांमध्ये डाऊनी मिल्ड्यू, करपा, मावा, झांटोमोनस यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून, पुढील हंगामासाठी होणार्‍या घडनिर्मितीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त
होत आहे.
सलग दोन महिने पाऊस पडल्याने द्राक्षबागांमध्ये वापसा न झाल्यामुळे औषध फवारणी करण्यासाठी शेतकर्‍यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तसेच असे पहिले वर्ष असेल की, मागील 30-40 वर्षांत मे महिन्यात रोज पाऊस झाला आहे.त्यामुळे पुढील वर्षाचा द्राक्ष हंगाम कसा राहील हे आता पूर्णपणे निसर्गावरच अवलंबून राहणार आहे.
तसेच घडनिर्मितीसाठी काडीस सूर्यप्रकाशाची आवश्यकता असताना, मागील दोन महिन्यांपासून सूर्यप्रकाशाअभावी काड्यांचे पोषण व वाढ खुंटली आहे. यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पार पडणारी खरड छाटणी व काडीची योग्य परिपक्वता यावर पुढील हंगामातील उत्पादनाची गुणवत्ता व प्रमाण अवलंबून राहणार आहे.

 

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago