शिंदेशाहीने जिंकला विश्वासदर्शक ठराव

फायनल परीक्षेतही सरकार पास
मुंबई : प्रतिनिधी
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या एकनाथ शिंदे व भाजपा सरकारने विश्वास दर्शक ठराव काल बहुमताने जिंकला. सरकारच्या बाजूने  बहुमतापेक्षा जास्त   मतदान झाले. सरकारच्या बाजूने 164 मते पडली, तर महाविकास आघाडीच्या बाजूने 99 मते मिळाली,

एकनाथ शिंदे हेच विधिमंडळाचे गटनेते असल्याचा निर्वाळा काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता. आज सकाळी विधिमंडळाचे कामकाज सुरू होताच सरकारवरील विश्वास दर्शक ठराव चर्चेला आला. उद्धव ठाकरे गटातील आणखीन एक आमदार संतोष बांगर हे आज सकाळी शिंदे गटात सहभागी झाल्याने शिंदे गटाचे आमदारांची संख्या आता 40 झाली आहे. तर शिवसेनेकडे अवघे 15 आमदार उरले आहेत. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी शिवसेना व भाजपाच्यावतीने हिप बजावण्यात आला होता. विधानसभा अध्यक्ष पदाची सेमी फायनल जिंकल्यानंतर शिंदे सरकारने आज फायनल ही जिंकल्याने आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनेक आमदार गैरहजर

विश्वासदर्शक ठरावाला अनेक आमदार धावपळ करत आले मात्र सभागृहाचे दरवाजे मतमोजणीमुळे बंद केल्याने ते सभागृहात वेळेत पोहचू शकले नाहीत, मालेगावचे आमदार मौलाना मुफ्ती हे हज ला गेलेलं आहेत तर संग्राम जगताप, अण्णा बनसोडे, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार हे बाहेर राहिले, त्यांना वेळेत पोचता आले नाही,

समाजवादी पार्टी तटस्थ

अबू आझमी काल प्रमाणेच आजही तटस्थ राहिले औरंगाबाद चे नाव बदलल्याने त्यांनी तटस्थ राहणे पसंत केले आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *