नाशिक

गोदा आरतीतून मतदार जनजागृती; एक दिवा मतदानासाठी उपक्रम

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणूक- 2025 च्या अनुषंगाने मतदार जनजागृती अभियानांंतर्गत गोदावरी नदीकिनारी रामकुंडावर सायंकाळी गोदा आरतीच्या निमित्ताने हजारो भाविकांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली.
मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या या अभिनव उपक्रमात गोदा आरतीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. नाशिक महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतदार जनजागृती प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांनी आपल्या मोबाइलचे टॉर्च सुरू करून मतदार जनजागृती अभियानाला प्रतीकात्मक पाठिंबा दर्शविला. रामकुंड, रामतीर्थ परिसरात नाशिक महापालिकेचे बोधचिन्ह, राज्य निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह व मतदार जनजागृती अभियानाचे बोधचिन्ह रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात येऊन नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. व्होट कर नाशिककर, कर मतदान- सांगतंय संविधान, मतदान सर्वश्रेष्ठ दान, अशा घोषणांनी संपूर्ण रामकुंड परिसर दुमदुमून गेला. यावेळी गोदावरी नदीत दिवे प्रज्वलित करून एक दिवा मतदानासाठी हे विशेष अभियानही राबविण्यात आले.
या कार्यक्रमास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त संगीता नांदूरकर, शिक्षणाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी उपस्थित राहून मतदार प्रतिज्ञा घेतली. या प्रतिज्ञेचे वाचन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या पदाधिकार्‍यांनीही उपस्थित नाशिककरांना प्रत्येक नागरिकाने मतदान करण्याचे आवाहन केले.

Voter awareness through Goda Aarti; Initiative for One Day Voting

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago