नाशिक

‘हसत हसत जीवन जगाव’ : माजी राज्यपाल राम नाईक

 

नाशिक :

प्रत्येक व्यक्तीने कोणतेही प्रश्न, संकट आणि आव्हाने हाताळतांना हसत हसत जीवन जगण्याचा प्रयन्त करून आपल्या शिक्षणातून समाजात चांगले व्यक्ती घडविले पाहिजे असा कानमंत्र उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आणि माजी केंद्रीय मंत्री  राम नाईक यांनी नामदार गोपाल कृष्ण गोखले स्मृती व्याख्यानाप्रसंगी उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थी यांना दिला.

महाराष्ट्र शैक्षणिक प्रशासकीय व व्यवस्थापन परिषद, पुणे तसेच डॉ.एम.एस.जी फौंडेशन, गोखले एज्युकेशन सोसायटी व सर डॉ. एम.एस. गोसावी कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आलेल्या ३० व्या राष्ट्रीय संवादाच्या निम्मिताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी  राम नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या संपूर्ण कार्यकाळाचा आढावा ध्वनी चित्रफित द्वारे घेण्यात आला.तसेच  नाईक यांनी आपल्या भाषणातून जे योग्य आहे आणि नेहमी सकारात्मक दृष्टीने बघून आपल्या बाजूने आणि विरुद्ध असणाऱ्या व्यक्तींना सोबत घेऊन सामाजिक हिताचे काम केल्याने त्याचा फायदा चिरंतनकाळासाठी समाजाला होऊ शकतो. त्यामुळे शिक्षण आणि समाज हे दोन्ही नाते दृढ करण्यास चांगला विद्यार्थी घडविण्याची जवाबदारी प्रत्येक शिक्षकावर आहे. त्याचप्रमाणे नाईक यांनी आपल्या आमदार ते राज्यपाल या जीवनप्रवासाचतील अनेक अनुभव व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायची चे सचिव तथा महासंचालक सर डॉ. एम.एस. गोसावी हे होते. तसेच  राम नाईक यांना नामदार गोपाल कृष्ण गोखले महराष्ट्र पुरस्कार सर डॉ. मो.स. गोसावी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला व सर डॉ. मो.स. गोसावी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वतीने जीवन साधना गौरव पुरस्कार देण्यात आल्याबद्दल श्री. राम नाईक यांचे हस्ते विशेष सम्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्याचे स्वागत महाराष्ट्र शैक्षणिक प्रशासकीय व व्यवस्थापन परिषदेचे सहसचिव प्रा. डॉ. केशव शिंपी यांनी केले. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी ‘स्वयंप्रेरणा आणि स्वयंप्रकाश’ या २ नियतकालिकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संस्थेतील पी.एचडी प्राप्त शिक्षक आणि विद्यापीठ पदवी-पदवीत्तर परीक्षेतील गुणवंत विद्यार्थीचा सत्कार प्रमुख पाहुण्याचे हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास राम जोर्वारकर, गोखले एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा. डॉ. आर.पी.देशपांडे, विभागीय सचिव प्रा. डॉ. राम कुलकर्णी,  शैलेश गोसावी, प्राचार्य डॉ.  ज्योती ठाकूर, तसेच विविध महाविद्यालयातील प्राचार्य,उपप्राचार्य,शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुग्धा जोशी व डॉ. स्नेहा रत्नपारखी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अंजली कुलकर्णी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर डॉ. एम.एस. गोसावी कॉलेज ऑफ नर्सिंग च्या सर्व शिक्षक,कर्मचारी यांनी केले होते.

Ashvini Pande

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

1 day ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

2 days ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

4 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

4 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

4 days ago