मान्यताप्राप्त आयव्हीएफ सेंटरकडूनच उपचार घ्यावेत : तज्ज्ञांचे मत

नाशिक : प्रतिनिधी
काही कारणामुळे जर एक स्त्री आई होऊ शकत नसेल अशा वेळी अशा स्त्रीबीजदानामुळे ती आई होऊ शकते. हे तंत्रज्ञानाचे यश असले, तरी आई होताना कायदेशीर मान्यता असलेल्या आयव्हीएफ सेंटरकडूनच उपचार घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

अपघाती मुला-मुलीचा मृत्यू, अकाली मेनोपॉज, उशिरा लग्न, स्त्रीबीजच तयार न होणे, अशा कारणांमुळे एखाद्या महिलेला जर गर्भधारणा हवी असेल अशा वेळी दुसर्‍या स्त्रीकडून स्त्रीबीज घेता येते आणि आई होता येते. या प्रक्रियेला कायदेशीर मान्यता असून, स्त्रीबीज दान करणार्‍या महिलेची संमती, आरोग्य तपासणी आणि तिला अगोदर एक मूल झालेले असल्यासच स्त्रीबीज दान करता येते. एका महिलेला एकदाच स्त्रीबीजदान करता येत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
नाशिकमध्ये अंदाजे 22 आयव्हीएफ सेंटर कायदेशीर मान्यताप्राप्त आहेत. या सेंटरमध्ये एआरटी कायद्यांंतर्गत संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने राबवली जात असल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञांनी सांगितले.
कधी घरातील एकुलता मुलगा किंवा मुलगी अपघाताने किंवा काही आजाराने मृत पावला अशा वेळी दुसरे मूल हवे असेल किंवा अनेकदा लग्न उशिरा होणे किंवा अन्य कारणामुळे वयाच्या चाळिशी किंवा 45 नंतर आई होण्याची इच्छा किंवा अनेकदा उशिरा दुसरे-तिसरे लग्न केले जाते. त्यांना प्रत्येकाला आपले मूल असले पाहिजे, असे वाटते.
ताणतणाव, दहा- पंधरा वर्षे वाट पाहून ज्यांना मूल होत नाही अशांना आयव्हीएफशिवाय पर्याय नसतो. अशा वेळी मान्यताप्राप्त आयव्हीएफ सेंटरकडून स्त्रीबीज घेतले जाते आणि ती महिला आई होऊ शकते.
महिला स्वेच्छेने स्त्रीबीजदान करू शकतात. यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे दिले जात नाहीत किंवा तसे आमिषही दाखवता येत नाही. असे प्रकार आढळल्यास त्या आयव्हीएफ सेंटरवर गुन्हा दाखल होऊ शकतो.
स्त्रीबीज काढताना चुकीच्या अनैसर्गिक पद्धतीने जर स्त्रीबीज काढल्यास त्या महिलेला त्रास होऊ शकतो. एआरटीअंतर्गत सर्व प्रक्रिया केली जाते.
वयाच्या 27 किंवा तिशीमध्येही पाळी जाते. मेनोपॉज लवकर येतो; परंतु ज्यांना आई व्हायचे आहे अशा महिलेला स्त्रीबीज घेऊन पुन्हा आई होता येते.

एखाद्या कारणामुळे जर एक स्त्री आई होऊ शकत नसेल अशा वेळी अशा स्त्रीबीजदानामुळे ती आई होऊ शकते. पण या प्रक्रियेसाठी कायदेशीर मान्यताप्राप्त आयव्हीएफ सेंटरकडूनच उपचार घ्यावेत.
-डॉ. निवेदिता पवार,
स्त्रीरोगतज्ज्ञ

स्त्रीबीज एकदाच दान करता येते. जास्त वेळेला स्त्रीबीज दान केल्यास त्या महिलेला आरोग्यदृष्टया हानिकारक ठरते. त्यामुळे मान्यताप्राप्त सेेंटरकडूनच उपचार घ्यावेत. प्रत्येकाने कायदा पाळणे गरजेचे आहे.
-डॉ. नलिनी बागूल,
स्त्रीरोगतज्ज्ञ

स्त्रीबीज कोण दान करू शकते?

ज्या स्त्रीला अगोदर एक मूल असेल, तिची स्त्रीबीज दान करण्याची इच्छा असेल, तिला कोणताही गंभीर आजार नसेल अशी महिला स्त्रीबीजदान करू शकते. यासाठी कोणतेही पैसे दिले जात नाहीत. सर्व प्रक्रिया कायदेशीर मार्गाने केली जाते.

स्त्रीबीज तयार न होण्याची कारणे

वय वाढल्यामुळे, उशिरा लग्न, ताणतणाव, प्रीमॅच्युअर ओव्हरी अ‍ॅन्ड फेल्यूअर, लवकर पाळी बंद होणे, तसेच गर्भाशयात गाठी असल्यास अशा केसेसमध्येही स्त्रीबीज तयार होत नाही.

Want to be a mother?

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

5 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

5 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

5 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

6 hours ago