नाशिक

वाढत्या थंडीमुळे उबदार कपड्यांचा बाजार गरम

तरुणाईकडून फॅशनेबल स्वेटरला वाढती मागणी

नाशिक : प्रतिनिधी
शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. किमान तापमान 9 अंशांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे थंडीपासून बचावासाठी नागरिकांकडून गरम कपड्यांच्या खरेदीला प्राधान्य देण्यात येत आहे. हिवाळ्यासाठी बाजारपेठेतही नवीन प्रकारचे विविध स्वेटर, जॅकेट विक्रीसाठी आले आहेत. थंडीपासून संरक्षणासाठी गरम कपड्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे.
गेल्या काही वर्षांत हिवाळ्याच्या काळात तरुणाईकडून फॅशनेबल कपड्यांचा वापर थंडीपासून बचावासाठी करण्यात येत आहे. स्टेटमेंट म्हणूनदेखील अनेक जण विविध प्रकारचे स्वेटर, जॅकेट, मफलर, स्वेट शर्ट यांचा वापर करत असल्याचे चित्र आहे.
थंडीपासून बचावासाठी नव्हे, तर इतरांपेक्षा आपण वेगळे दिसावे म्हणून तरुणींकडून फॅशनेबल उबदार कपड्यांना अधिक पसंती दिली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हाफ स्वेटर, मफलर, कानटोपी, कानपट्टी यांचा समावेश आहे. तरुणाांठी जॅकेट झिपर, प्रिंटेंड मंकीकॅप, हँडग्लोव्हज विक्रीसाठी आले आहेत.

पुरुष ः

स्वेट शर्ट- 800 ते 1000 रुपये
ट्रेंडी हुडी- 900 ते 1200 रुपये
वूलन स्वेटर- 1200 रु.पासून
बायकर जॅकेट-1700 रु.पासून
कार्गो जॅकेट-2000 रु.पासून

महिला ः

स्वेटर- 800 ते 1500 रु.
फॅशनेबल स्वेटर-1500-2000
लेदर जॅकेट- 200 रु.पासून
स्टोल/शाल- 200 ते 400 रु.
हातमोजे- 150 रुपयांपासून

ऑनलाइन शॉपिंगला पसंती

सध्या बाजारपेठेत जाऊन खरेदी करण्याबरोबर ऑनलाइन शॉपिंगला पसंती देण्यात येत आहे. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटनेही आपल्या वेबसाइटवर ग्राहकांना स्वेटर उपलब्ध करून दिले आहेत. पुरुष, महिला व लहान मुलांसाठी ऑनलाइन स्वेटर विक्रीसाठी वेबसाइटने उपलब्ध करून दिले आहेत.

थंडी वाढल्याने उबदार कपड्यांना मोठी मागणी आहे. महिला व लहान मुलांच्या स्वेटरला अधिक मागणी आहे. जॅकेट, मफलरचीही विक्री हळूहळू वाढत आहे. अजून थंडी वाढली की खरेदीदेखील वाढणार आहे. किंमतीमध्ये गतवर्षीपेक्षा 5 ते 10 टक्के वाढ झाली आहे.
– रमेश खैरे, स्वेटर विक्रेता

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

17 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

17 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

17 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

17 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

17 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

17 hours ago