आस्वाद

वाट बघताना..

सविता दरेकर

बसस्टॉपवर तीन तास खोळंबून नीरजची वाट बघत संतापलेल्या निशाच्या मनातली घालमेल वाढली होती. खूप उशीर झाला होता. आता बस येऊन थांबली तशी निशा बसमध्ये प्रवेश करत बॅगा ठेवून खिडकीजवळच सीटवर बसली..आणि बाहेर बघत शून्यात हरवली..
तिला एक वर्षासाठी कंपनीकडून एका चांगल्या पोस्टसाठी दिल्लीला जायचे होते.आणि नीरज मीटिंगमध्ये व्यस्त असल्याने वेळेत पोहचू शकला नाही…
आदल्या दिवशीच दोघांनी ठरवले होते तिला पोहचवायला तो वेळेत हजर राहीन..पण हे नित्याचेच झाले होते..नीरजचा जॉब धावपळीचा आणि सतत मीटिंग, टूरने व्यस्त असलेला…यापूर्वीही दोघांनी असे ठरवलेले प्लॅन अनेकदा वेळेअभावी बिघडले होतेच..आणि त्यांना वाट बघणे आता सवयीचेही झाले होते… आता तर दोघांचे लग्नही ठरले होते..! निशा शून्यात गेली तशी नीरजवर रागावू की समजून घेऊ, असा विचार करतानाच त्यांची पहिली भेट आठवली… एका बर्थ डे पार्टीत दोघांची ओळख झालेली..आणि पहिल्या नजरेतच दोघेही एका शून्यात हरवले..जणू आपलंसं वाटणारं व्यक्तिमत्त्व सापडलंय… ग्रुपमध्ये मित्रमैत्रिणींचा संवाद झाला. हसीमजाकही झाली…आणि आनंदाची ओंजळ भरून निशा घरी परतली…! स्वतःशीच हसत निशा बसच्या ब्रेकने शून्यातून बाहेर आली…! बस थांबली होती. प्रवासी चढत होते. तिच्या शेजारी एक महिला धसकन येऊन बसली.. तिच्या चेहर्‍यावर तिचा चढलेला पारा स्पष्ट दिसत होता… निशा जरा सरकून घेत बघतच राहिली…! तिने हातात फोन घेतला आणि भोवतालच्या लोकांचा विचार न करताच धाडधाड समोरच्या व्यक्तीच्या चुकांचा पाढा वाचू लागली… हे बघ महेश मला काही सांगू नकोस… कालपासून वाट बघतेय. मीटिंग टूर आवरून येशील लवकर. पण, तुला वेळच कुठेय म्हणा माझ्यासाठी…
तू कामच करत रहा फक्त …
मी आता चाललेय एकटीच माहेरी..!
तुझ्या भरवशावर भावाचे ठरलेले लग्नही लागून जायचे पण तुला यायला वेळ मिळणं कठीणच दिसतंय..
आता महिनाभर येणार नाही मग समजेन..
सांभाळ तूच घर, आता बघते मीही…कसे ठेवतो घर सर्व नीटनेटके ते..!
ठेव फोन बोलू नकोस..बाय?
बोलून दमल्यावर मॅडम शांत सुस्कारा टाकत सीटला टेकून आरामात बसल्या.
तशी निशा बोलती झाली..
मॅडम किती चिडलात हो…! काही प्रॉब्लम आहे का…?
तशी ती म्हणाली, काही नाही हो ताई, पण सगळे पुरुष असेच वागतात का?
बाई म्हणजे फक्त त्यांना हवं तसंच वागणार, त्यांच्या वेळेतच ऍडजस्ट करायची का आपली स्वप्न, हौसमौजही…?
आपल्यासाठी जराही वेळ नको का काढायला यांनी…जीवाभावाचे नाते जोडते स्त्री पण तिच्या वाटेला तडजोडच जास्त…!
शांत व्हा मॅडम..मला कळत नाही हसावे की रडावे यावर…कारण मीही थोड्या वेळापूर्वी अशीच चिडले होते माझ्या फ्रेंडवर…
पण एक गोष्ट कळाली तुमचे बोलणे ऐकून…की ही समस्या छोटी असते. पण त्याचं टेन्शनच जास्त घेते स्त्री..म्हणून वाद वाढतात…
आपलं माणूस आपल्या मनासारखंच वागावं हा अट्टहासच निराशेचं खरं कारण असतं प्रत्येकाचं..!
पण आजच्या काळात कमवण्यासाठी नोकरी-व्यवसायातली स्त्री, पुरुषांची खूप कसरत होते आणि यातूनच नेमके जवळचे नात्याकडूनच मन समजून घेण्याची अपेक्षा केली जाते…
यात दोषी कोणीच नाही हो…वेळ साथ देत नाही ..एकतर नाते सांभाळ नाहीतर नोकरी-व्यवसाय सांभाळ हा प्रश्‍न पडतो …तेव्हा कुटुंब, नाते सुखी ठेवण्यासाठीच नोकरी-व्यवसायात वेळ देणं गरजेचं असतं..
जमेन तसा वेळ काढला जातोच की नाते सुंदर सुखी ठेवण्यासाठी…आपणच समजून घ्यायला हवं.. एवढं मला समजतंय फक्त ….
ओह हो..! किती छान बोललीस गं…पटतंय मलाही..
मी जरा जास्तच बोलले ना फोनवर..
थांब हं सॉरी म्हणते त्यांना …म्हणत ती फोनवर बोलती झाली..
हॅलो महेश सॉरी हं…मी जरा तापले होते..म्हणून रागात बोलले सॉरी हं..तू मीटिंग आटोपून वेळेत लग्नाला हजर हो…मी वाट बघतेय मग सोबतच घरी जाऊया….
बाय हं काळजी घे…!
एव्हाना बस ट्रेनच्या स्टॉपपर्यंत आली होती..निशा स्मित हसतच त्या महिलेशी हात मिळवत भेटूया म्हणत उतरली…
ट्रेनच्या दिशेने निशा चालू लागली तर तिथे गेटवरच नीरज निशाची वाट बघत उभा होता… तिला सरप्राइज द्यायला..गावाहून बसचा प्रवासात साथ न देता नीरज ट्रेनच्या प्रवासात निशाला सोबत करायला आला होता तेही आई-वडिलांसह…
थेट दिल्लीला जाऊन तिची व्यवस्था लावून परत यायला त्याने रजा घेतली होती…
आई-बाबांचे आशीर्वाद घेत दोघेही ट्रेनमधे बसले. आता निशाच्या रागाचा मात्र कचरा झाला होता.
आणि ही वाट बघणंही किती हुरवणारं, सुखावणारं असतं हेही वेळ शिकवून गेली…!

Bhagwat Udavant

Recent Posts

कसबेसुकेनेत बिबट्या जेरबंद

कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…

1 day ago

सातपूरला ज्योती स्ट्रक्चर कंपनीला आग

सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या  आगीचे कारण…

2 days ago

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…

3 days ago

जीएम साहेब येता दारी तोच दिवाळी दसरा

मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…

3 days ago

ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम !

ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…

3 days ago

पारा ५.७ अंशांवर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर!

पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड :  प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…

5 days ago