सविता दिवटे-चव्हाण

प्रत्येक स्त्रीला माहेरची नितांत ओढ असते. तिच्या आयुष्याची सुरुवातीची काही वर्षे माहेरच्या मातीत गेलेली असतात. आई-वडील, भावंडे, माहेरची माणसं, गाव, माती निसर्ग यांबद्दल अनामिक आकर्षक तिला असते. माहेरची माणसं कुठेही भेटली तरी तिला खूप आनंद होतो. सासरी कितीही चांगली परिस्थिती असली तरी चार दिवस माहेरी जाऊन माहेरपण अनुभवण्यात वेगळेच सुख असते. आई-वडील, भावंडे, भाचे या जिव्हाळ्याच्या माणसांत परमानंद असतो.संसार, नोकरी, आपले दैनंदिन जीवन विसरून फक्त माहेरीच पुन्हा बालपण जगता येते.कधीतरी बालमैत्रिणींची भेट होऊन गप्पांची मैफल रंगते.जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. आई, वहिनींच्या हातचे सुग्रास जेवण, चेष्टामस्करी मनाला सुखावून जाते. आईने आपल्या आवडीनिवडी जपणं, काळजी घेणं, लेक माहेरी आल्याचे वडिलांच्या चेहर्‍यावरील समाधान, त्यांचं नातवंडांत रमून जाणं, भाऊ-बहिणींच्या तासन्तास चालणार्‍या गप्पा, जणू बाहेरच्या जगाचा विसर पडतो. माहेरी घालवलेले सुखद क्षण फक्त तिचे असतात. तिची विश्रांतीची जागा आणि आपले हट्ट पुरवून घ्यायला माहेर हे तिचं हक्काचं ठिकाण असतं. असं माहेर ज्या स्त्रीला मिळतं ती स्वतः भाग्यवान समजते. दिवाळी, रक्षाबंधन या सणांना तर माहेरशिवाय माहेरवाशीणला चैन पडत नाही. छोट्याशा खेडेगावातील माहेर असेल तर संपूर्ण गाव आणि निसर्गाचीच ती माहेरवाशीण होते. गावात प्रवेश करताच शाळा, गावातील वेगवेगळी मंदिरे, सार्वजनिक पाणवठा, गल्लीतील दंगामस्ती डोळ्यात साठवत ती घरात प्रवेश करते. काका-काकू, चुलत भावंडे, शेजारी सगळीकडे पाहुणचार असतो.शेतात मनसोक्त फिरणे, चिंचा, बोरं, आंबे, भाजीपाला, गुरेढोरे आणि तेथील नागमोडी पायवाटा तिला स्त्रीला साद घालत असतात आणि नकळत तिची पावलं तिकडे वळतात.झाडाला बांधलेला झोका तिला गतकाळात घेऊन जातो.झोक्याच्या आंदोलनाबरोबर ती बालपणात हरवते आणि भाच्यांच्या संगतीत बालपणातील गमतीजमती आठवतात. चुलीवरचे खमंग जेवण तिला तृप्ती देऊन जाते. आता धावपळीच्या जगात माहेरी जाऊन रहायला फारसा कुणाला वेळ नाही. पण तरीही ती वेळ मिळेल तसे माहेरचे सुखाचे क्षण वेचण्याचे प्रयत्न करते. कारण माहेरपण तिच्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा देऊन पुढील काही काळासाठी जणू एक टॉनिक बनते.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago