नाशिक:प्रतिनिधी
जाखोरी गावाजवळील चांदगिरी येथे घरासमोर असलेल्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका आठ वर्षाच्या बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कार्तिक शिवाजी शेलार (वय ८) चांदगिरी हा मुलगा घराजवळ असताना जवळच असलेल्या कडवा कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेला होता. परंतु, पाणी जास्त असल्याने सदर बालकाला अंदाज न आल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.दरम्यान, गावकरी ना समजताच त्यांनी तातडीने त्याला बाहेर काढले व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. या घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
धरणांतून रोखलेला विसर्ग सुरू; ग्रामीण भागात रिपरिप सुरूच इगतपुरी : प्रतिनिधी इगतपुरी तालुक्यात गत महिन्यात…
शहरातील 12 ठिकाणचे सिग्नल बंद; वाहनधारकांचा होतोय गोंधळ नाशिक : प्रतिनिधी शहरातील 60 पैकी 40…
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…