पक्ष्यांचा अधिवास धोक्यात, पाणीपुरवठा योजना सलाइनवर
निफाड : तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्राचे भरतपूर व आंतरराष्ट्रीय रामसर दर्जा प्राप्त नांदूरमध्यमेश्वर धरणातील पाण्याने तळ गाठल्यामुळे पक्षी अभयारण्यातील पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. या धरणावर अवलंबून असणार्या अनेक प्रादेशिक व स्थानिक नळपाणीपुरवठा योजना अखेरच्या घटका मोजत आहेत. धरणात तातडीने पाणी सोडण्याची मागणी पक्षिमित्रांकडून होत आहे.
नोव्हेंबरपासून परदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू होते आणि पर्यटकांची गर्दी वाढते. मात्र, यंदाची पाणीटंचाई आणि धरणातील पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे पाणथळ जागा कोरड्या पडल्या आहेत. यामुळे पक्ष्यांना अन्न शोधणे कठीण झाले आहे. जलपर्णी आणि विविध प्रजातींच्या माशांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.
या धरणावर लासलगाव-विंचूर 16 गाव, 12 गाव पिंपरी, निमगाव 13 गाव, भेंडाळी, चांदोरी, सायखेडा यांसह गोदाकाठच्या अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. सध्या धरणाला वाळवंटाचे स्वरूप आले असून, परिसरातील हॉटेल व्यवसाय आणि पर्यटनावरही याचा परिणाम होत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभाग, वन विभाग आणि पक्षीप्रेमींनी समन्वय साधून धरणात तत्काळ पाणी सोडावे आणि पाणी दीर्घकाळ टिकविण्याचे नियोजन करावे, असे आवाहन केले आहे.
अभयारण्य परिसरात धरणातील पाणथळ भाग पूर्णपणे नाहीसा झाला असून, पात्र कोरडेठाक पडले आहे. अशी परिस्थिती यापूर्वी कधीही उद्भवली नव्हती. पाणी सोडल्याने पक्ष्यांच्या जीवितावर थेट परिणाम झाला असून, दुर्मिळ पाणवेलींचे अस्तित्व संपुष्टात येत आहे.
– गंगाधर आघाव, पक्षिमित्र, नांदूरमध्यमेश्वर
Water level at Nandur Madhmeshwar Dam has dropped
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…