नाशिक

शहरावर पाणी टंचाईचे संकट

गंगापूर धरणात केवळ 27 टक्के पाणीसाठा
नाशिक : प्रतिनिधी
पावसाने ओढ दिल्याने शहरात पाणी कपातीचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापुर धरणात केवळ 27 टक्केच पाणी साठा शिल्लक राहिला आहे. संपूर्ण जून महिना संपला तरी शहरात समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणी कपातीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जर समाधानकारक पाऊस नाही झाला तर नाशिककरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात जिल्हयाच्या काही भागात पाऊस झाला पण त्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. धरणाच्या पाणी साठयात वाढ होण्यासाठी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडणे गरजेचे आहे. गंगापूर धरणासह जिल्हयातील इतर धरणाचा पाणीसाठीही कमी झाला आहे. जुलै महिन्यात तरी समाधानकारक पाऊस पडेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पावसाला विलंब होत असल्याने धरणातील पाणी साठ्यात घट होत आहे.

पेरणी लांबणीवर
पावसाने पाठ फिरवल्याने पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त्र झाले आहे. जुलै महिन्यात तरी चांगला पाऊस पडेल याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे.

पाणी कपातीचे संकट
शहरातला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात अवघा 27 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने येत्या आठवड्याभरात चांगला पाऊस झाला नाही तर पाणी कपातीच्या संकटाचा सामना नाशिककरांना करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जिल्हयातील धरण      उपलब्ध पाणीसाठा ( टक्केवारी)
गंगापूर धरण समुह
गंगापूर धरण –              27 %
कश्यपी –                    16 %
गौतमी गोदावरी –           24 %
आळंदी प्रकल्प –            02 %
पालखेड धरण समुह
पालखेड                       43 %
करंजगवण                    11 %
वाघाड-                        05 %
ओझरखेड –                  26 %
पुणेगाव-                      11 %
तिसगाव-                   शुन्य टक्के
दारणा –                       14 %
भावली-                       08%
मुकणे –                       30%
वालदेवी-                      10%
कडवा –                        13 %
नांदुर मधमेश्‍वर-              82 %
भोजापूर-                      06 %
गिरणा खोरे धरण समुह
चणकापुर –                    20 %
हरणबारी-                      27 %
केळझर-                       06 %
नागासाक्या-                शुन्य टक्के
गिरणा धरण –                 33 %
पुनद –                           21%
माणिकपुंज-                  शुन्य टक्के

हेही वाचा: पाणी काटकसरीने वापरण्याचे, नारायणबापू सोसायटीचे आवाहन

Ashvini Pande

Recent Posts

नाशिकच्या पोलीस अधीक्षकपदी बाळासाहेब पाटील

नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर…

4 hours ago

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

2 days ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

2 days ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

3 days ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

3 days ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

3 days ago