पाणी काटकसरीने वापरण्याचे, नारायणबापू सोसायटीचे आवाहन

नाशिकरोड:- नाशिक महानहगपालिकेने केलेले नियोजन आणि उन्हाळ्याची तीव्रता पाहता नारायणबापू
नगर सोसायटीच्या सभासदांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे कळकळीचे आवाहन चेअरमन
रितेश गांगुर्डे आणि संचालक मंडळाने केले आहे.
एप्रिल अणि मे या महिन्यांत पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील असून,
सोसायटीच्या वतीने तसेच नियोजन करण्यात आले आहे. पाणीटंचाई जाणवणार नाही, यासाठी प्रयत्न
करण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गांगुर्डे यांनी केले आहे.
घरातील पाणी भरुन झाल्यावर नळ बंद करावा, पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, कोठे पाणी वाया
जात असेल, तर सोसायटीला त्वरित कळवावे, सर्वांना पाणी मिळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन
चेअरमन आणि संचालक मंडळाने केले आहे.
गेल्या काही महिन्यापासून पाणी पुरवठा सोसायटीने सुरळीतपणे पाणीपुरवठा केला. आता
महापालिकेकडून पाणी कमी प्रमाणात येत असल्याने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
थकबाकीदार सभासदांनी थकबाकी त्वरित (३१ मार्च अखेर) भरावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *