नाशिक

शहरात एक दिवसाआड पाणी?

प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली, पुण्याच्या धर्तीवर निर्णय

नाशिक : प्रतिनिधी
अल निनोच्या प्रभावामुळे शहरासह जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने नाशिककरांवर पाणी कपातीचे सावट गडद झाले आहे. नाशिक महापालिकेला शासनाने 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याच्या सूचना दिल्या असल्या, तरी सध्या 13 ऑगस्टपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उर्वरित अठरा दिवसांची पाण्याची तूट भरून काढण्यासाठी पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिका एक दिवसाआड पाणी, हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आठवडाभरात याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो मनपा आयुक्तांसमोर ठेवला जाणार असल्याचे समजते.
दरम्यान, पावसाने अशीच पाठ फिरवल्यास नाशिककरांना पाणीबाणीला सामोरे जावे लागेल. मागील हंगामात शंभर टक्के पाऊस पडल्याने नाशिक शहराची तहान भागविणार्‍या धरणात एप्रिलपर्यर्ंत पुरेसा जलसाठा होता. पण सध्याच्या स्थितीत धरण समूहात 25 टक्के जलसाठा आहे. नाशिक शहराला दररोज 600 दशलक्ष लिटर म्हणजेच 21 दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान, महापालिका प्रशासन थेट पाणीकपात करण्याऐवजी गंगापूर धरणातील अतिरिक्त 600 दशलक्ष घनफूट पाणी वापरासाठी चर खोदला जाणार आहे. यासह एक दिवसाआड पाण्याचा निर्णय घेत 15 ते 20 टक्के पाणीकपात केली जाऊ शकतेे.
यंदा अल निनो धोक्यामुळे मान्सून सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राज्य शासन अलर्ट मोडवर आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. अल निनोचा धोका पाहता गंगापूर, दारणा, मुकणे धरणातून होणारा पाणीपुरवठा जपून वापरा, अशा सूचना केल्या आहेत. एरवी जूनमध्ये पावसाचे आगमन होते. पण यंदा अल निनोमुळे जूनचा दुसरा आठवडा उलटूनही अद्याप मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावलेली नाही. चांगल्या पर्जन्याची अपेक्षा व्यक्त केली जात असली, तरी सध्या शहरवासीयांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. मनपाचे नियोजन 31 जुलैपर्यंत पाणी पुरवण्याचे आहे. पण जलसंपदा विभागाने 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा शासनाने पाणी जपून वापरण्याचे निर्देश दिले आहेत. अठरा दिवसांची पाण्याची तूट भरून काढण्यासाठी दिवसाआड पाणी सोडण्याच्या निर्णयाला सामोरे जावे लागणार आहे.

धरणातील स्थिती
धरण        आरक्षण      शिल्लक साठा     टक्केवारी
गंगापूर     4,600            1,921               11.4
मुकणे      1,600             1,811                25.02
दारणा      200                 815                  11.4

बारा कोटींच्या चरला मंजुरीची प्रतीक्षा
शहरावर ओढावणारी पाणी टंचाईची स्थिती पाहता महापालिका प्रशासनाने गंगापूर धरणात चर खोदण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी साडेबारा कोटींचा खर्च असून, आठ दिवसांपूर्वी चर खोदण्याचा आराखडा (डीपीआर) फोर्ट रेस या ठाण्याच्या संस्थेने तयार केला आहे. तो महासभेवर मंजुरीकरिता ठेवला जाणार असून, सध्या आचारसंहितेमुळे हा निर्णय लटकला आहे.

नाशिक महापालिकेला जलसंपदा विभागाने 31 ऑगस्टपर्यर्ंत पाणी पुरवठ्याचे नियोजनाचे निर्देश दिले आहेत. विद्यमान परिस्थिती पाहता याबाबत आयुक्त मनीषा खत्री, महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे आदी सर्वांशी चर्चा करून पाणीकपातीबाबत निर्णय घेतला जाईल. मनपाकडे 13 ऑगस्टपर्यर्ंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.
– रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा

Water supply every other day in the city?

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

17 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

17 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

18 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

18 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

18 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

18 hours ago