नाशिक

सहा दिवसांनंतर पंचवटीतील पाणीपुरवठा सुरळीत

नियोजनशून्य कारभाराचा नागरिकांना फटका

नाशिक : प्रतिनिधी
स्मार्ट सिटीने बसविलेल्या फ्लोेमीटरमुळे शहरातील पंचवटी व नाशिक पूर्व विभागातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊन लाखो नागरिकांना पाणीबाणी परिस्थितीचा सामना करावा लागला. अखेर शुक्रवार (दि.27)नंतर या विभागातील पाणीपुरवठा पूर्णक्षमतेने सुरळीत झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. दरम्यान, नियोजनशून्य कारभाराचा फटका बसल्याने स्मार्ट सिटी व महापालिकेविरोधात नागरिकांनी तीव्र संताप
व्यक्त केला.
गेल्या शनिवारी घेतलेल्या शटडाउनदरम्यान बारा बंगला ते निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणार्‍या 900 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गंगापूररोडवरील जुन्या पंपिंग स्टेशन येथे लिकेज झाले. त्यानंतर दुरुस्तीकामासाठी पाच दिवस गंगापूर धरणावरून पंपिंग बंद ठेवल्याने शहरातील सर्व भागांतील जलवाहिन्या कोरड्याठाक पडल्या. हवेचा दाब निर्माण होऊन पाणीपुरवठा यंत्रणाच ठप्प
झाली.
जलवाहिनीचे दोन दिवसांत दोन वेळा लिकेज दुरुस्ती केल्यानंतरही हवेच्या दाबामुळे पंचवटीसह काठे गल्ली, टकलेनगर, नांदूर, दसक आदी भागांत पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता.
जलशुद्धीकरण केंद्रांतील यंत्रसामग्री, जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच फ्लोमीटर बसविण्याच्या कामासाठी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग व स्मार्ट सिटी कंपनीतर्फे सुरू असलेल्या कामांत तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या शनिवारपासून बंद असलेला पंचवटीसह काठे गल्ली,
नांदूर-मानूर, कोणार्कनगर, द्वारका आदींसह पंचवटी व नाशिक पूर्व विभागातील लाखो नागरिकांना खासगी टँकरने पाणी मागवण्याची वेळ आली. जलवाहिनीतील एअर ब्लॉक कायम राहिल्याने सहाव्या दिवशी पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची नामुष्की
महापालिकेवर ओढावली.

निलगिरी बाग येथील जलशुद्धीकरण केंद्रावर पूर्णक्षमतेने पाणी येत असल्याने पुरवठा सुरळीत झाला आहे. जलवाहिनीतील एअर ब्लॉक काढण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने अथक प्रयत्न केले. दुरुस्तीच्या कामामुळे एकूण क्षमतेच्या 93 टक्के पाणी पुढे सरकू शकल्याने पंचवटीसह काठे गल्ली, टकलेनगर, नांदूर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.
-रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा

 

Gavkari Admin

Recent Posts

मराठी माणूस, ठाकरे ब्रँडमुळे सरकार झुकले

खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्‍यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…

1 hour ago

जिल्ह्यातील धरणांतून 1,44,053 क्यूसेक विसर्ग

धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…

2 hours ago

रेल्वे थांबवणार्‍यांकडून 42 हजारांचा दंड वसूल

चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…

2 hours ago

…तर अभिजात मराठी ज्ञानभाषा, जनभाषा

सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…

2 hours ago

दागिन्यांसाठी महिलेची हत्या

पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…

2 hours ago

कालव्यात फेकलेल्या कचर्‍यामुळे आरोग्य धोक्यात

अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…

2 hours ago