नाशिक

मालेगाव महापालिकेकडून वृक्षांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

मालेगाव : शहरात लावण्यात आलेल्या झाडांचे संवर्धन होणे ही काळाची गरज बनली आहे. येथील महानगरपालिकेकडून शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या वृक्षांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करून ती जगवली जात आहेत. शहरातील तापमानाचा पारा हा 43 अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. त्यामुळे उन्हाच्या काहिलीने नागरिक हैराण झाले आहेत. एकीकडे कडक उन्हामुळे पाण्यावाचून अनेक ठिकाणी वृक्ष मरत असताना येथील महापालिकेने मात्र एकात्मता चौक, कॉलेज मैदानातील जॉगिंग ट्रॅकला लागून असलेली झाडे तसेच मालेगाव-सटाणा रोडवरील सिमेंट रस्ता दुभाजकाच्या मध्यभागी लावण्यात आलेली झाडे जगवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मनपाच्या पाणीटँकरद्वारे येथील झाडांना सकाळी व सायंकाळच्यावेळी पाणी देण्यात येत असल्याने ही झाडे ऐन उन्हाळ्यात टवटवीत दिसत असल्याने वृक्षप्रेमी नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

Gavkari Admin

Recent Posts

पोल्ट्रीचे काम सोडणे युवकाला पडले महागात, मालकाने केले असे काही….

चांदवड तालुक्यातील  युवकाचे अपहरण करून अमानुष मारहाण व्हिडीओ व्हायरल...! पोलिस कारवाई करणार का...? मनमाड :…

2 hours ago

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

नाशिक: प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्यापरीक्षेचा निकाल…

6 hours ago

ठिबक सिंचन करत जगवली 600 चिंचेची रोपटी

वृक्षसंवर्धनासाठी सरसावली वडांगळी ग्रामपंचायत सिन्नर : प्रतिनिधी उन्हाच्या दाहकतेमुळे दीड-दोन वर्षांपूर्वी लागवड केलेली चिंचेची रोपटी…

2 days ago

जिल्हास्तरीय यंत्रणा सतर्क; रामकुंडावर मॉकड्रिल

नाशिक : प्रतिनिधी भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पाश्वर्र्भूमीवर हल्ला झाल्यास कशी काळजी घ्यावी, याची नागरिकांना माहिती…

2 days ago

इगतपुरीत नाले-गटारी सफाई मोहीम

इगतपुरी : प्रतिनिधी पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी शहरातील लहान-मोठे नाले, गटारी स्वच्छता मोहीम राबवून नगर…

2 days ago

नाशिकरोड परिसरात बेमोसमी पावसाची हजेरी

चाकरमान्यांना करावा लागला विविध अडचणींचा सामना नाशिकरोड : प्रतिनिधी नाशिकरोड परिसरात शुक्रवारी (दि. 9) सायंकाळपासून…

2 days ago