वावीजवळ ५० लाखांचा गुटखा व मुद्देमाल जप्त
वावी: वार्ताहर-
सिन्नर शिर्डी रस्त्यावर पिंपरवाडी टोल नाक्याजवळ पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून अशोक लेलँड ट्रक क्र एम एच २८ बी बी २४३८ व टोयोटा इनोव्हा एम एच ४६ एल २९९९ ची तपासणी केली असता त्यात ७५ गोण्यामध्ये भरलेला सुगंधी पानमसाला गुटखा ३० लाख ७८ हजारांचा मिळून आला याबाबत पोलीस नाईक देविदास माळी यांनी फिर्याद दिली असून सलीम खान अफसर खान,अहमद खान रेहमद खान,समीर खान अफसर खान ,शेख रेहमान शेख रहीम ,अरीफ खान दिलावर खान सर्व रा.ताजनगर अलीमनगर अमरावती यांच्या विरोधात ३२८,१८८,२७२,२७३ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून २० लाखांचे दोन्ही वाहनेही जप्त केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी दिली.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक देविदास माळी,शेलार,भास्कर जाधव आदींच्या पथकाने केली.
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…