दि. 22 ते 28 फेब्रुवारी 2026
पुरुषोत्तम नाईक

मेष : पैशांची आवक वाढेल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. शेअरमध्ये लाभ होतील. नोकरदारांना अडचणी त्रस्त करतील. व्यापारी, व्यावसायिकांची आर्थिक गणिते जुळतील. पैशांची आवक वाढेल. बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न मार्गी लागतील. प्रकृतीची काळजी घ्या.
वृषभ : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि, गुरू अनुकूल आहेत. रवी, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. धनचिंतांना उतार पडेल. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. नोकरदारांना अडचणींचा सामना करावा लागेल. व्यापारी, व्यावसायिकांनी कुणावर विसंबून निर्णय घेऊ नये. शेअरमध्ये सावधपणे गुंतवणूक करावी.
मिथुन : भाग्योदय होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहे. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदारांची कामासाठी धावपळ होईल. व्यापारी, व्यावसायिकांचा भाग्योदय होईल. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात दिरंगाई होईल. आरोग्य प्रश्नांकडे लक्ष पुरवा.
कर्क : प्रवास टाळा
या सप्ताहात शनि अनुकूल आहे. रवी, मंगळ, बुध, शुक्र, गुरू, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागेल. प्रवास करणे त्रासदायक ठरेल. शक्यतो प्रवास टाळा. वाहन जपून चालवा. आरोग्य प्रश्नांची काळजी घ्या. शासकीय, कोर्ट-कचेरीची कामे लांबणीवर टाका.
सिंह : वाद टाळा
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. रवी, शनि, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. मानसिक अस्वास्थ्य राहील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांनी प्रत्येक पाऊल विचारापूर्वक उचलणे आवश्यक ठरेल. वाद टाळणे व मनावर संयम ठेवणे हिताचे ठरावे. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या : काळजी घ्या
या सप्ताहात शनि, बुध अनुकूल आहे. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, शुक्र, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्र्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक दिलासा मिळेल. मदतीचा हात प्राप्त होईल. नोकरदार व व्यापारी व्यावसायिकांच्या मार्गात काटे पेरलेले असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. खर्च वाढतील. विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या.
तूळ : उत्साह वाढेल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. शासकीय, कोर्ट-कचेरीची कामे मनाप्रमाणे होतील. नोकरदारांवर कामाचे दडपण राहील. व्यापारी, व्यावसायिकांना मंगलवार्ता कळतील. शेअरमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करा. नवग्र्रहांची कृपादृष्टी असल्याने उत्साह वाढविणार्‍या घटना घडतील.
वृश्चिक : सुखवार्ता कळतील
या सप्ताहात शनि, बुध, शुक्र अनुकूल आहेत. रवी, मंगळ, गुरू, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी व्यावसायिकांची कामे अपेक्षेप्र्रमाणे होणार नाहीत. प्रवास टाळा, वाहन काळजीपूर्वक चालवा. सुखवार्ता कळतील. आरोग्याची काळजी घ्या.
धनु : जोरदार आगेकूच
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, गुरू, राहू, केतू अनुकूल आहेत. शनि प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्तिती अडचणींची राहील. खर्च आटोक्यात राहतील नोकरदारांवर जास्त कामाची जबाबदारी पडेल. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. सन्मानप्राप्तीचे योग येतील. प्रकृती प्रश्न जपा.
मकर : अचानक धनलाभ
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. राहू, केतू प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. मात्र अचानक धनलाभाचे योग संभवतात. खर्च वाढतील. नोकरदारांना पगारवाढ संभवते. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृध्दी होईल. विरोधकांच्या कारवाया उधळल्या जातील. आरोग्यप्रश्नांची दखल घ्या. कुपथ्य टाळा.
कुंभ : इच्छा पूर्ण होतील
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. मनावर संयम ठेवा, वाद टाळ, शासकीय कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. प्रकृती सांभाळा.
मीन : अडचणी सौम्य होतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू प्रतिकूल आहेत. शनिची साडेसाती सुरू आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. मात्र, खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवास टाळाच. वाहन जपून चालवा. नोकरदारांच्या अडचणी सौम्य होतील. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे चुकतील. शासकीय, कोर्ट-कचेरीची कामे विलंबाने होतील.

Weekly Horoscope

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

4 hours ago

फुलोरा…

‘फार फार तर वारा बाहेरून येईल पण फुलून तर आतूनच यावे लागते..’ कविवर्य संजय चौधरी…

4 hours ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

4 hours ago

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…

4 hours ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

4 hours ago

बांगलादेशमधील सत्तांतर

दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडला आहे. बांगलादेशमधील नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत दीर्घकाळ…

5 hours ago