दि. 22 ते 28 फेब्रुवारी 2026
पुरुषोत्तम नाईक

मेष : पैसे वसूल होतील

या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. शेअरमध्ये लाभ होतील. नोकरदारांना अडचणी त्रस्त करतील. व्यापारी, व्यावसायिकांचे अडकलेले पैसे वसूल होतील

वृषभ : यशप्राप्ती होईल

या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि, गुरू अनुकूल आहेत. रवी, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. धनचिंतांना उतार पडेल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. नोकरदारांना अडचणींचा सामना करावा लागेल. व्यापारी, व्यावसायिकांनी कुणावर विसंबून निर्णय घेऊ नये.

मिथुन : जोरदार आगेकूच

या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहे. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदारांची जोरदार आगेकूच होईल. व्यापारी, व्यावसायिकांचा भाग्योदय होईल. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात दिरंगाई होईल. आरोग्य प्रश्नांकडे लक्ष पुरवा.

कर्क : प्रकृतीची काळजी घ्या

या सप्ताहात शनि अनुकूल आहे. रवी, मंगळ, बुध, शुक्र, गुरू, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागेल. प्रवास करणे त्रासदायक ठरेल. शक्यतो प्रवास टाळा. वाहन जपून चालवा. आरोग्य प्रश्नांची काळजी घ्या.

सिंह : आर्थिक समृद्धी

या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. रवी, शनि, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. यां सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. मानसिक अस्वास्थ्य राहील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक समृद्धी लाभण्याची शक्यता. वाद टाळणे व मनावर संयम ठेवणे हिताचे ठरावे.

कन्या : घेणेकरी सतावतील

या सप्ताहात शनि, बुध अनुकूल आहे. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, शुक्र, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्र्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. घेणेकरी सतावतील. मदतीचा हात प्राप्त होईल. नोकरदार व व्यापारी व्यावसायिकांच्या मार्गात काटे पेरलेले असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. प्रकृतीची काळजी घ्या.

तूळ : मंगलवार्ता कळतील

या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. शासकीय, कोर्ट-कचेरीची कामे मनाप्रमाणे होतील. नोकरदारांवर कामाचे दडपण राहील. व्यापारी, व्यावसायिकांना मंगलवार्ता कळतील. शेअरमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करा.

वृश्चिक : वाहन जपून चालवा

या सप्ताहात शनि, बुध, शुक्र अनुकूल आहेत. रवी, मंगळ, गुरू, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी व्यावसायिकांची कामे अपेक्षेप्र्रमाणे होणार नाहीत. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. सुखवार्ता कळतील. आरोग्याची काळजी घ्या.

धनु : प्रगती होईल

या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, गुरू, राहू, केतू अनुकूल आहेत. शनि प्रतिकूल आहे. चंद्रभ्रमणे प्रतिकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती अडचणींची राहील. खर्च आटोक्यात राहतील नोकरदारांवर जास्त कामाची जबाबदारी पडेल. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार प्रगती होईल. सन्मानप्राप्तीचे योग येतील. प्रकृती प्रश्न जपा.

मकर : बढती मिळेल

या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. राहू, केतू प्रतिकूल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. मात्र, अचानक धनलाभाचे योग संभवतात. खर्च वाढतील. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृद्धी होईल.

कुंभ : विवाह जमतील

या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. विवाहेच्छुकांचे विवाह जमतील. शासकीय कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल.

मीन : मानसिक अस्वास्थ्य

या सप्ताहात रवी मंगळ, बुध, गुरू, शुक्र, राहू केतू प्रतिकूल आहेत. शनिची साडेसाती सुरू आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. प्रवास टाळाच. वाहन जपून चालवा. नोकरदारांच्या अडचणी सौम्य होतील. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे चुकतील.

Weekly Horoscope

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

4 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

4 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

5 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

5 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

5 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

5 hours ago