नाशिक

भूमी अभिलेख कर्मचार्‍यांचे सोमवारपासून बेमुदत ‘कामबंद’ आंदोलन सुरू

तीन टप्प्यांनंतरही निर्णय नाही; कास्ट्राईब संघटनेचा पाठिंबा

सिन्नर : प्रतिनिधी
राज्यभरातील भूमी अभिलेख विभागातील कर्मचार्‍यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार (दि.2) पासून बेमुदत ‘कामबंद’ आंदोलन सुरू केले आहे. तीन टप्प्यांत आंदोलनाचा इशारा देऊनही शासनाने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने अखेर संपाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे कर्मचार्‍यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाला कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. महसूलमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
विभागातील कर्मचार्‍यांना तांत्रिक वेतनश्रेणी लागू करणे, विभागाचा नवीन आकृतिबंध मंजूर करणे, प्रवासभत्त्यात वाढ करणे, भूकरमापकांना स्वतंत्र रोव्हर मशिन उपलब्ध करून देणे, इंटरनेट डेटासाठी स्वतंत्र निधी देणे तसेच प्रत्येक भूकरमापकाला स्वतंत्र लॅपटॉप देणे या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांसाठी संघटना पातळीवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, शासनस्तरावर केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप कर्मचार्‍यांनी केला आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार राबविण्यात आलेल्या 150 दिवसांच्या सेवाकार्मी कार्यक्रमादरम्यान महसूलमंत्र्यांनी तांत्रिक वेतनश्रेणी व नवीन आकृतिबंधाबाबत सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही ठोस निर्णय न झाल्याने राज्यातील विविध संघटनांनी एकत्र येत ‘कृती समिती’ स्थापन केली आहे. या समितीच्या आवाहनानुसार राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. कास्ट्राईब संघटना पूर्ण ताकदीने यात सहभागी झाली आहे. सिन्नर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील संतोष मानकर, रामचंद्र खरे, विशाल खैरनार, प्रशांत पंडित, मोतीलाल चौरे यांच्यासह सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

आंदोलनाचे टप्पे असे…

दरम्यान, 18 फेब्रुवारीपासून आंदोलनाची टप्प्याटप्प्याने सुरुवात करण्यात आली होती. 18 व 20 फेब्रुवारी रोजी मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन करण्यात आले. 23 ते 27 फेब्रुवारीदरम्यान अर्जित रजा अर्ज भरून असहकार आंदोलन राबविण्यात आले. 27 फेब्रुवारी रोजी जमाबंदी आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. तरीही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर बेमुदत संपाची हाक देण्यात आली. या आंदोलनामुळे भूमी अभिलेख विभागाचे दैनंदिन कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. जमिनीच्या नोंदी, मोजणी, उतारे आदी कामांसाठी येणार्‍या सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडण्याची चिन्हे आहेत.

Land records employees begin indefinite ‘work shutdown’ from Monday

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

7 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

7 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

7 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

7 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago