दि.19 ते 25 जुलै 2026
पुरुषोत्तम नाईक

मेष : अडचणी सौम्य होतील
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, गुरू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणी त्रस्त करतील. घेणेकरी सतावतील. बँका, तगादे लावतील. खर्च वाढतील. नोकरदारांच्या अडचणी सौम्य होतील. व्यापारी, व्यावसायिकांचे व्यवसाय तेजीत चालतील. शासकीय, कोर्ट कचेरीची कामे लांबणीवर पडतील. प्रकृती जपा.
वृषभ : आर्थिक प्रगती
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्र्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांची आर्थिक प्रगती होईल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात दिरंगाई होईल. मनावर संयम ठेवा. वाद टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या.
मिथुन : अनुकूलता प्राप्त होईल
या सप्ताहात रवी, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. मंगळ प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा, नोकरदारांवर कामाचा जास्त ताण पडेल. व्यापारी, व्यावसायिकांच्या योजना कार्यान्वित होतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अनुकूलता प्राप्त होईल. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क :अचानक धनलाभ
या सप्ताहात मंगळ, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, बुध, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्र्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. येणे पैसे वसूल होतील. पैशांचे नवे स्त्रोत सुरू होतील. नोकरदारांना अचानक धनलाभाचे योग येतील. व्यापारी, व्यावसायिकांना अडचणी सतावतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रकृती जपा.
सिंह : आर्थिक दिलासा
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. रवी, गुरू, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. आर्थिक दिलासा मिळेल. अडकलेले पैसे वसूल होतील. नोकरदारांनी वरिष्ठांशी वाद टाळावे. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृध्दी होईल. मानसिक अस्वस्थतेवर मात कराल. शेअरमध्ये सावधपणे गुंतवणूक करा. प्रकृतीची काळजी घ्या.
कन्या : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शनि अनुकूल आहेत. शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्र्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. खर्च वाढतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. नोकरदारांच्या व व्यावसायिकांच्या अडचणी सौम्य होतील. विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष द्या.
तूळ : आडाखे अचूक ठरतील
या सप्ताहात बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, मंगळ, शनि प्रतिकुल आहेत. गुरू संमिश्र आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे अचूक ठरतील. विरोधकांच्या कारवायांमुळे त्रस्त व्हाल. आरोग्य जपा.
वृश्चिक : आनंदवार्ता कळतील
या सप्ताहात मंगळ, रवी, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. बुध, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना अडचणीतून वाटचाल करावी लागेल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामातील अडचणी दूर होतील. आनंदवार्ता कळतील.
धनु: समिकरणे जुळतील
या सप्ताहात बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, गुरू, शनि, मंगळ प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांची समिकरणे जुळतील. शासकीय, कोर्ट, कचेरीची कामे लांबणीवर पडतील. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्यप्रश्न अडचणीत आणतील.
मकर : पैशांची आवक वाढेल
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शनि अनुकूल आहेत. रवी, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांनी कुणावर विसंबून कामे करू नये. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ : जोरदार आगेकूच
या सप्ताहात बुध, शुक्र अनुकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. मानसिक अस्वस्थता त्रस्त करेल. नोकरदारांचे वरिष्ठांशी वाद होतील. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात सावध भूमिका ठेवा. आरोग्य चांगले राहील.
मीन : सुखवार्ता कळतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, राहू, केतू, शुक्र प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना बढती मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे अचूक ठरतील. सुखवार्ता कळतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अनुकूलता प्राप्त होईल. आरोग्याची काळजी घ्या.

Weekly Horoscope

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

18 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

18 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

19 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

19 hours ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

19 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

19 hours ago