नाशिक

नवीन वर्षाचे  जल्लोषात स्वागत

 

 

 

 

नाशिक : प्रतिनिधी

 

नवीन वर्षाचे जल्लोषपूर्ण वातावरणात फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार स्वागत करण्यात आले. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव  नसल्याने निर्बंधमुक्त  थर्टी फर्स्ट साजरा झाल्याने तरूणाईचा द्विगुणित  झाला होता. नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच उत्साहाचे वातावरण होते..  त्यामुळे हाॅटेल्स ,रेस्टॉरंट,चित्रपटगृहे  , मंदिरे अशा सर्व ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती.  आपापल्या घरी कुटुंबिय,मित्र मैत्रिणी आणि आप्त स्वकीयांसोबत जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत केले. तर अनेकांनी हाॅटेल्सच्या पार्सल सेवेचा लाभ घेत थर्टी फर्स्टचे सेलेब्रेशन केले. तर केक कापून नवीन वर्षाचे स्वागत  करण्याकडे तरूणाईचा कल असल्याने  केक शॉपवर गर्दी झाली होती.

नाशिक पर्यटनस्थळ असल्याने शहरात राज्यातील विविध भागातून  पर्यटक  दाखल झाले आहेत.  शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.तसेच थर्टी फर्स्टला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेत उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

 

 

नव वर्षाचे सोशल मिडीयावर रंग

सध्याच्या काळात  सोशल मिडियावर सण ,उत्सवाचे जोरदार स्वागत करण्यात येते. नवीन वर्ष सुरू व्हायला दोन दिवस बाकी असताना सोशल मिडियात नवीन वर्ष स्वागताचे रंग दिसत होते.त्यात थर्टी फर्स्टच्या रात्री तर एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. सरत्या वर्षाचा मागोवा घेत नवीन वर्षाचा संकल्प करत सोशल मिडियात नव वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. रात्री बारा नंतर नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा जणू पाऊस सोशल मिडियात झाला

 

 

हाॅटेल व्यावसायिकांना अच्छे दिन

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी थर्टी फर्स्टला नाईट आऊट , पार्टीज आयोजित केल्या होत्या. त्यामुळे हाॅटेल्स,रेस्टॉरंटवर गर्दी झाली होती. परिणामी थर्टी फर्स्टसाठी हॉटेल व्यावसायिकांना अच्छे दिन आले आहेत.  कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून  नुकसान सहन करावे लागले होते.

 

फटाक्यांची आतषबाजी

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी  अनेकांनी विविध प्रकारचे प्लॅन केले होते. त्यात काहीनी  रात्री बारा वाजेच्या सुमारास  फटाक्यांची आतषबाजी करत   नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले.

 

 

 

 

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago