काय हवे तुला
विचारले का कोणी तिला?
जिला माहित असतं
काय हवय सर्वांना…
मनापासून अगदी
ती विचारपूस करते सर्वांची,
दुखलं -खूपलं कोणाचं
तर काळजी घेते सगळ्यांची..
डॉक्टर असो की कुणी अधिकारी
शिक्षिका असो की अभियंता,
नोकरी – घर समतोल साधून
सगळ्याचीच करते चिंता..
थकून भागून घरी आली तरी
थेट स्वयंपाक घरात घुसणार,
कुटुंबीयांचं पोट भरल्यावर तिच्या
चेहऱ्यावर समाधान दिसणार…
आजी ,मावशी ,आत्या, बायको,
बहिण, मैत्रीण, मुलगी वा सून,
असो कोणत्याही रूपात ती
कर्तव्य पालन तिचे येते दिसून…
कधीही घेत नाही माघार
कुठलीही जबाबदारी पार पाडताना,
पण पाहिलंच नाही कधी तिला
आपल्या इच्छा मांडताना..
जमेल का कुणाला
तिचे मन ओळखायला?
विचारेल का कुणी तिला
काय हवे आहे तुला?
महिला दिनानिमित्त आपल्या कुटुंबातील सर्व महिलांचा विचार नक्कीच करून बघा आणि विचारायला विसरू नका…
काय हवे तुला?
—–राखी खटोड
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…
ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर: साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…