महाराष्ट्र

वीरांच्या मिरवणूकीला उधाण

धुळवड पारंपरिक उत्साहात साजरी
नाशिक ः प्रतिनिधी
धुळवड पारंपारिक उत्साहात साजरी करण्यात आली.धुळवड आणि वीरांच्या मिरवणूकीने उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. दिवसभर अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांचा उत्साह धुळवडीला वाढला होता.
होलीच्या दुसर्‍या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते उत्तर भारतीयंामध्ये धुळवडीला रंगपंचमी साजरी करतात.
शहर आणि उपनगरांमध्ये होळीभोवती देवाचे प्रतिक म्हणून लहान मुलांना वीराची वेशभूषा करून नाचविण्यात आले.तर शहरात प्रथेप्रमाणे जुने नाशिक ते रामकुंडापर्यंत वीरांची मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूकीला प्राचीन परंपरा असल्याने दाजीबा वीर मिरवणूकीचा उत्साह शिगेला पोहचला होता.याप्रसंगी दाजिबा विरांचा विशेष मान आहे.

 

 

 

 

शहरातील मेनरोड,सराङ्ग बाजार, तीवंधा चौक,पाटील गल्लीसह गोदाघाट आदी परिसरातून ढोल वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
धुलिवंदन अर्थात धुळवडीला वीर नाचविण्यात आले.पाटील गल्ली येथून विरांच्या मिरवणूकीला दुपारी चार वाजता सुरूवात झाली.सायंकाळी विरांच्या टाकाची विधीवत पूजा करण्यात आली.टाक खोबर्‍याच्या वाटीत घेवून मिरविण्यात आले. होळीला प्रदक्षिणा मारून पुढे मिरवणूक मार्गस्थ करण्यात आली.शहरातून मिरविल्यानंतर टाकांचे रामकुंडावर स्नान घालून विधिवत पूजन करण्यात आले.

 

 

 

त्यानंतर घरी नैवेद्य दाखविण्यात आला.या दिवशी होळीच्या निखार्‍चांवर पाणी तापवून त्याने घरातील सर्वांनी अंघोळ करण्यास आगामी उन्हाळा सुसह्य होतो.उष्म्याचे विकार होत नाही अशी धारणा असल्याने लहानथोर स्नान करतात.कोरोनामुळे दोन वर्ष सण उत्सवांवर सावट होते.यंदा वीरांची मिरवणूक,धुळवडीचा उत्साह जोरदार साजरा करण्यात आला.

 

 

 

बाशिंगाच्या वीरांची जूनी परंपरा शहरात आहे.मिरवणूक बुधवार पेठ,चव्हाटा संभाजी चौक,तांबट गल्ली,मेनरोड,रविवार कारंजा आदी ठिकाणाहून गोदाघाटावर रात्री बारा वाजता येते परतीच्या मार्गावरही पारंपरिक वाद्यांच्या गजरात घरी नेली जाते.पाचव्या दिवशी रहाड खोदून पुजा केली जाते.
रहाडीत रंगपंचमी खेळली जाते.
सागर बांडे

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

भुजबळ- जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली

आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…

5 minutes ago

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

21 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

21 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

21 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago