लघुशंकेसाठी थांबलेला तरुणास झाडीत बसलेल्या दारुड्यांकडुन युवकासह मैत्रीणीलाही मारहाण, व्हिडीओ व्हायरल
सिडको : विशेष प्रतिनिधी
इंदिरानगर बोगदा ते दीपाली नगर दरम्यानच्या रस्त्यावर लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणाला झाडीत बसून दारू पिणाऱ्या काही बेवड्यांनी बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, त्या तरुणाला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या त्याच्या मैत्रीणीलाही या दारुड्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे. या ठिकाणी अनेक नागरिक उपस्थित होते मात्र त्यांनी वाचवण्यासाठी पुढे येण्याऐवजी व्हिडीओ काढण्यास पसंती दिली. रात्रीच एक खून झाला आणि आता हा प्रकार. नाशिकमध्ये खाकीच काही धाकच उरला नसल्याने असे प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत
ही घटना समाजमाध्यमांवर एका व्हिडीओमुळे उघडकीस आली असून, त्या व्हिडीओमध्ये मारहाणीचे थरकाप उडवणारे दृश्य स्पष्ट दिसत आहेत. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ही घटना घडली त्या ठिकाणी नेहमीच अंधाराचे साम्राज्य असते आणि झाडीत दारू पिणाऱ्या टोळक्यांचे थैमान असल्याच्या तक्रारी आधीही स्थानिकांनी केल्या होत्या. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आता थेट मारहाणीपर्यंत परिस्थिती गेली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत असून, समाजमाध्यमांवरून मिळालेल्या व्हिडीओच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप केंद्रबिंदू या शहरात शहापूर/ साजिद शेख गेल्याकाही दिवसांपासून विधीमंडळात एक-…
जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान: दोन रुग्णांचा मृत्यू, 14 रुग्णांवर उपचार सुरू मोखाडा: …
आधी प्रेम... मग लिव्ह इन अन नंतर ... शहापूर/साजिद शेख २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला अश्लील…
दिंडोरी येथील अपघातात सात ठार अपघातात तीन महिला, तीन पुरुष एक बालकाचा समावेश दिंडोरी…
साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…
नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून,…