पुण्यातील तरुणावर गुन्हा दाखल
सिडको: विशेष प्रतिनिधी :-लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षांच्या कालावधीत युवतीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या पुण्यातील तरुणाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात पोस्कोसह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या तरुणाचा एप्रिलमध्ये साखरपुडा झाल्याचे समजल्यावर संबंधित तरुणीने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तिच्या भावनांशी खेळ करत धमकी देण्यास सुरुवात केली.
या प्रकरणातील आरोपी आकाश ताजणे (रा. कर्वेनगर, पुणे; मूळगाव – शेकईवाडी, ताजणे मळा, ता. अकोले, जि. अहमदनगर) याने २६ फेब्रुवारी २०२१ पासून एप्रिल २०२५ दरम्यान फिर्यादी युवतीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. तिने नाशिकच्या कॉलेज रोडवर, त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल आणि पुण्यातील डेक्कन परिसरात घडलेल्या प्रकारांची माहिती पोलिसांना दिली आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी आकाशचा साखरपुडा झाल्याचे समजल्यावर, पीडितेने त्याच्याशी संपर्क केला असता, त्याने तिचा फोन उचलणे बंद केले. इतकंच नव्हे, तर फोनवर “माझं लग्न मोडलं तर तुझंही लग्न मोडीन” अशी धमकी देत भावनिक आणि मानसिक छळ केला.या प्रकरणी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रौंदळे हे करत आहेत.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…