नवी दिल्ली :
केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, सिम बाईंडिंगचे नियम लागू करण्याची 28 फेब्रुवारीची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही. नवीन नियमांनुसार फोनमध्ये सिमकार्ड नसल्यास व्हॉट्सअॅपसारखे मेसेजिंग अॅप काम करणार नाही. कॉम्प्युटरवर लॉगिन केलेले व्हॉट्सअॅॅपदेखील सहा तासांत लॉगआउट होईल.
जेव्हा तुम्ही एखाद्या अॅपला सिम बाईंडिंगशी जोडता, तेव्हा ते अॅप तेव्हाच उघडेल जेव्हा तुमचे नोंदणीकृत सिमकार्ड त्याच फोनमध्ये असेल. हा नियम दि.1 मार्च 2026 पासून लागू होईल. केंद्रीय संचारमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, सध्या नियमांचे पालन करण्याची मुदत वाढवण्यावर कोणताही विचार नाही. हे नियम राष्ट्रीय सुरक्षा आणि फसवणूक रोखण्यासाठी लागू करण्यात आले आहेत आणि सुरक्षेच्या मुद्यांवर सरकार कोणतीही तडजोड करणार नाही. युजर्सना हे सुनिश्चित करावे लागेल की त्यांचे व्हॉट्सअॅॅप ज्या नंबरवर आहे, ते सिम त्याच फोनमध्ये असावे. जर सिमकार्ड फोनमधून काढले तर मेसेजिंग अॅॅप काम करणे बंद करू शकते.
इंडस्ट्री असोसिएशनने सरकारला इशारा दिला आहे की, दर सहा तासांनी लॉगआउट करण्याचा नियम कामासाठी व्हॉट्सअॅॅप वेबवर अवलंबून असलेल्या प्रोफेशनल्ससाठी त्रासदायक ठरेल. तसेच एकाच अकाउंंटचा वापर करणार्या कुटुंबांनाही अडचणी येतील. केंद्र सरकारच्या आदेशानुसार, कंपन्यांना 120 दिवसांच्या आत याबाबत अहवाल सादर करावा लागेल.
नियमांचे पालन न केल्यास दूरसंचार कायदा 2023, दूरसंचार सायबर सुरक्षा नियम आणि इतर लागू कायद्यांनुसार कारवाई केली जाईल.
सिम बाईंडिंग एक सुरक्षा कवच आहे. हे तुमच्या मेसेजिंग अॅपला तुमच्या फिजिकल सिमकार्डसोबत लॉक करते. याचा सर्वार्ंत मोठा फायदा हा आहे की, कोणताही हॅकर किंवा ठग तुमच्या नंबरचा वापर दुसर्या कोणत्याही डिव्हाईसवर बसून करू शकणार नाही. युजर्सना हे सुनिश्चित करावे लागेल की त्यांचे व्हॉट्सअॅप ज्या नंबरवर आहे, ते सिम त्याच फोनमध्ये असावे. जर सिम कार्ड फोनमधून काढले तर मेसेजिंग अॅप काम करणे बंद करू शकते.इंडस्ट्री असोसिएशन आयएएमएआयने सरकारला इशारा दिला आहे की दर 6 तासांनी लॉग-आउट करण्याचा नियम कामासाठी व्हॉट्सअॅप वेबवर अवलंबून असलेल्या प्रोफेशनल्ससाठी त्रासदायक ठरेल.
नियम पाळले नाहीत तर कारवाई
केंद्र सरकारच्या आदेशानुसार, कंपन्यांना 120 दिवसांच्या आत याबाबत अहवाल सादर करावा लागेल. नियमांचे पालन न केल्यास दूरसंचार कायदा 2023, दूरसंचार सायबर सुरक्षा नियम आणि इतर लागू कायद्यांनुसार कारवाई केली जाईल.
WhatsApp blocked without SIM card, Centre’s solution to fraud
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…