नाशिक

सिडकोसाठी स्वतंत्र बसस्थानकाची मागणी कधी पूर्ण होणार?

सिडकोवासीयांचा प्रशासनाला सवाल

सिडको : दिलीपराज सोनार
नाशिक शहराच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या सिडको वसाहतीला आज 35 ते 40 वर्षांचा इतिहास लाभला आहे. या कालावधीत सिडकोसह इंदिरानगर, पाथर्डी, अंबड, कामटवाडे आणि परिसरात अनेक वसाहतींचा झपाट्याने विकास झाला. धुळे, जळगाव, नंदुरबार तसेच खानदेशातील विविध भागांतून रोजगार, उद्योग, व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्ताने हजारो कुटुंबे येथे स्थायिक झाली. त्यामुळे लोकसंख्येत मोठी वाढ झाली असली, तरी त्यानुसार नागरी सुविधांचा विस्तार झालेला नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.
वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत वाहतूक व्यवस्था, रस्ते, पार्किंग, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि सार्वजनिक सेवांमध्ये अनेक त्रुटी कायम आहेत. यामध्ये स्वतंत्र एसटी बसस्थानकाचा अभाव ही सर्वाधिक तीव्रतेने जाणवणारी समस्या ठरत आहे. सिडको व परिसरातील हजारो नागरिकांचे दररोज गावाकडे येणे-जाणे सुरू असते. सण-उत्सव, कौटुंबिक कार्यक्रम, शेतीची कामे तसेच नातेवाइकांच्या भेटीगाठींसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. मात्र, सिडको परिसरात स्वतंत्र बसस्थानक नसल्याने प्रवाशांना शहरातील मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस) गाठावे लागते. त्यामुळे अतिरिक्त प्रवास, वेळेचा अपव्यय आणि आर्थिक खर्च वाढतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि कामगार वर्गाला याचा मोठा फटका बसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांदरम्यान विविध पक्षांनी सिडकोसाठी स्वतंत्र बसस्थानक उभारण्याचे आश्वासन दिले होते. अनेक जाहीरनाम्यांमध्ये या मागणीचा समावेशही करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर या आश्वासनांचा विसर पडतो का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सिडको परिसरात अद्याप काही शासकीय व राखीव भूखंड उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. या जागांपैकी योग्य भूखंड निश्चित करून स्वतंत्र बसस्थानक उभारण्यासाठी शासन, महापालिका आणि राज्य परिवहन महामंडळाने संयुक्तपणे पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनीही या प्रश्नासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. वाढती लोकसंख्या, विस्तारत चाललेला परिसर आणि बदलत्या नागरी गरजा लक्षात घेता सिडकोसाठी स्वतंत्र बसस्थानक ही आता केवळ मागणी राहिलेली नसून ती काळाची अपरिहार्य गरज बनली आहे. या सुविधेमुळे हजारो नागरिकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्याबरोबरच सिडकोच्या विकासाला नव्या गतीने दिशा मिळेल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

When will the demand for a separate bus station for CIDCO be met?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

21 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

21 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

21 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

21 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago